शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

नागपुरात मुद्रांक विक्रीतून लाखोंची वरकमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 10:32 AM

मूळ किमतीपेक्षा अधिक दराने मुद्रांक विक्री करू नये, असा नियम आहे. परंतु नागपुरातील तहसील कार्यालयासह अनेक ठिकाणातील मुद्रांक विक्रेते कमिशन देणे बंद केल्याची बतावणी करून धडाक्यात वरकमाई करीत आहेत.

ठळक मुद्देमहिन्याला तीन कोटी स्टॅम्प पेपरची विक्री अडवणुकीतून सामान्यांची होतेय लूट

सुमेध वाघमारे /विशाल महाकाळकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मूळ किमतीपेक्षा अधिक दराने मुद्रांक विक्री करू नये, असा नियम आहे. परंतु नागपुरातील तहसील कार्यालयासह अनेक ठिकाणातील मुद्रांक विक्रेते कमिशन देणे बंद केल्याची बतावणी करून धडाक्यात वरकमाई करीत आहेत. १०० रुपयांच्या मुद्रांकावर १० ते २० रुपये तर ५०० रुपयांच्या मुद्रांकावर २० ते ३० रुपये वसूल करीत आहेत. शहरात दर महिन्याला साधारण तीन कोटी मुद्रांकाची विक्री होत असल्याने विक्रेते लाखो रुपयांची वरकमाई करीत आहेत. हे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मधून समोर आले आहे.डुप्लिकेट सर्टिफिकेट, गॅप सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व, जातीचा दाखला, सौदा पावती, करारनामा, खरेदी खत, वाटणीपत्र आदी कारणांसाठी मुद्रांकाचा (स्टॅम्प पेपर) उपयोग होतो. डिसेंबर ते मे महिन्यात साधारणत: संपत्तीची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते आणि नंतर शाळा-महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी लागणाऱ्या विविध प्रमाणपत्रासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत स्टॅम्प पेपर विक्रीचे प्रमाण दुप्पट असते. शहरात ५५ मुद्रांक विक्रेते आहेत. मुद्रांक विक्री करणाऱ्यांना कमिशनपोटी प्रति शंभर रुपए दराच्या मुद्रांकावर तीन टक्के कमिशन दिले जाते. परंतु अनेक विक्रेते शासनाने कमिशन बंद केल्याचे ग्राहकांना सांगून मनमानेल तसे अधिक दर आकारत असल्याची स्थिती आहे.वर्षाला ३६ कोटी मुद्रांकाची विक्रीसह जिल्हा निबंधक, मुद्रांक जिल्हाधिकारी नागपूर शहर कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, शहरात ५५ मुद्रांक विक्रेते आहेत. या विक्रेत्यांवर ५०० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या स्टॅम्प पेपरच्या विक्रीवर निर्बंध आणले आहेत. यामुळे यांच्याकडून १०० आणि ५०० रुपयांच्याच मुद्रांकांची विक्री होते. साधाारण दर महिन्याला सरासरी तीन कोटी रुपयांच्या मुद्रांकांची विक्री होते. वर्षाला ही विक्री ३६ कोटी रुपयांपर्यंत जाते.विक्रेत्यांची १३ टक्के कमाईमुद्रांक विक्रेत्याला १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर तीन टक्के कमिशन मिळते. काही विक्रेते ग्राहकांकडून मूळ किमतीच्या १० टक्के रक्कम जास्त घेत असल्याने विक्रेत्यांची कमाई १३ टक्क्यांपर्यंत जाते. तहसील कार्यालयाच्या परिसरात हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. याची माहिती अधिकाºयांनाही आहे. तरीदेखील विक्रेत्यांवर कारवाई होत नाही. एकप्रकारे हा लोकांना पाठीशी घालण्याचाच प्रकार होत असल्याचे चित्र आहे. असे केले ‘स्टिंग ऑपरेशन ’‘लोकमत’ चमूने नागपूर तहसील कार्यालयाच्या परिसरात बसलेल्या मुद्रांक विक्रेत्यांना १०० आणि ५०० रुपयांचे स्टॅम्प पेपरची मागणी केली. कार्यालयातील काही विक्रेत्यांनी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरमागे ११० तर ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपर मागे ५२० रुपयांचे दर सांगितले. कार्यालयाच्या बाहेरील विक्रेत्यांनी यापेक्षा जास्त दर सांगितले. या मागील कारण विचारले असता, स्टॅम्प पेपरवर मिळणारे कमिशन बंद केल्याचे खोटे कारण विक्रेत्याने दिले. काहींनी टंचाईमुळे शासनाकडून वेळेवर मुद्रांक मिळत नसल्याचे कारण दिले. अधिक पैसे देण्यास नकार दिल्यावर अनेकांनी स्पष्ट नकारही दिला. अखेर कार्यालयातीलच एका विक्रेत्याकडून १०० रुपयाचा स्टॅम्प पेपर ११० रुपयांत तर ५०० रुपयांचा स्टॅम्प पेपर ५२० रुपयांमध्येच घ्यावा लागला.तक्रार प्राप्त झाल्यावर कारवाईस्टॅम्प पेपरची जादादराने विक्री केली जाते हे सर्वच जण सांगतात. परंतु कारवाई करण्यासाठी लेखी तक्रार हवी असते. पुरावे हवे असतात, ते कुणी देत नाही. यामुळे कारवाई होत नाही. लेखी तक्रार प्राप्त झाल्यास नक्कीच कारवाई करू.-सु. अ. बुटले, सह जिल्हा निबंधक, जिल्हाधिकारी मुद्रांक, नागपूर शहर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी