शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

‘नीट’मध्ये लाहिरी बोड्डू ‘टॉप’,अन्वय पानगावकर दुसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 11:46 PM

वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी ‘सीबीएसई’तर्फे घेण्यात आलेल्या ‘नीट’चा(नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) निकाल सोमवारी जाहीर झाला. निकालांमध्ये यंदाही मुलींनीच बाजी मारली असून, जी.एच.रायसोनी विद्यानिकेतनची विद्यार्थिनी लाहिरी बोड्डू हिने उपराजधानीतून अव्वल क्रमांक पटकाविला आहे. लाहिरीपाठोपाठ सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी अन्वय पानगावकर याने ६३९ गुणांसह शहरातून द्वितीय स्थान पटकाविले.

ठळक मुद्दे‘सेंट पॉल’चा असाही दबदबा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी ‘सीबीएसई’तर्फे घेण्यात आलेल्या ‘नीट’चा(नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) निकाल सोमवारी जाहीर झाला. निकालांमध्ये यंदाही मुलींनीच बाजी मारली असून, जी.एच.रायसोनी विद्यानिकेतनची विद्यार्थिनी लाहिरी बोड्डू हिने उपराजधानीतून अव्वल क्रमांक पटकाविला आहे. तिला ७२० पैकी ६४४ गुण प्राप्त झाले व अखिल भारतीय पातळीवर तिचा २०८ वा क्रमांक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढलेली दिसून येत आहे. मागील वर्षी नागपुरातील ४०० च्या आत क्रमांक मिळविता आला नव्हता.६ मे रोजी ‘नीट’चे आयोजन करण्यात आले होते. शहरातील परीक्षा केंद्रांवर रविवारी २० हजारांहून अधिक परीक्षार्थी सहभागी झाले होते. लाहिरीपाठोपाठ सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी अन्वय पानगावकर याने ६३९ गुणांसह शहरातून द्वितीय स्थान पटकाविले. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी शार्दुल खंते हा ६३७ गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिला.‘नीट’मध्ये विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र व रसायनशास्त्राच्या पेपरमध्ये अडचण जाणवली. विशेषत: भौतिकशास्त्राचा पेपर हा आकडेमोडीमुळे लांबलचक व कठीण वाटला होता. याचा परिणाम ‘नीट’मध्ये जाणवला. ‘नीट’च्या निकालांमध्ये शिवाजी विज्ञान महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विज्ञान महाविद्यालय, सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालय यांच्यात चुरस दिसून आली.हे आहेत ‘टॉपर्स’१ लाहिरी बोड्डू          ६४४      जी.एच.रायसोनी विद्यानिकेतन२ अन्वय पानगावकर ६३९    सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालय३ शार्दुल खंते            ६३७     डॉ.आंबेडकर महाविद्यालय४ सोहम व्यवहारे      ६२८      सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालय५ राहुल बजाज         ६२०      सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालय६ रिशिका मोदी       ६१४       सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालय७ नंदिता गावंडे        ६०९      शिवाजी विज्ञान महाविद्यालय८ अनमोल अरोडा     ६०१      सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालय९ मानव खळतकर    ५९३      शिवाजी विज्ञान महाविद्यालय१० सुहानी जैन          ५९२        -सरावातूनच मिळाले यश : लाहिरी बोड्डूशहरातून प्रथम आलेल्या लाहिरी बोड्डू हिने अपेक्षेनुरूप यश मिळाल्याचे सांगितले. गेले दोन वर्ष मी नियमित अभ्यासावर भर दिला होता. अभ्यासाचा जास्त तणावदेखील घेतला नव्हता. मात्र दररोज तीन ते चार तास अभ्यास सुरू होता. विशेषत: ‘ए़नसीईआरटी’च्या पुस्तकांतून अभ्यास केला, सोबतच नियमित सराव सुरूच होता. अखेरच्या दिवसांत पेपर्स सोडविण्यावर लक्ष केंद्रित केले. पुढे जाऊन मला दिल्ली येथील ‘एम्स’मध्ये प्रवेश घ्यायचा आहे, असे लाहिरीने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. बारावीत तिला ९१.६० टक्के गुण होते. आपल्या यशाचे श्रेय तिने वडील श्रीनिवास राव बोड्डू व आई उमादेवी बोड्डू यांना दिले.‘नीट’मध्ये ‘सेंट पॉल’चा दबदबा वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी ‘सीबीएसई’तर्फे घेण्यात आलेल्या ‘नीट’चा(नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट) निकाल सोमवारी जाहीर झाला. यंदा निकालांमध्ये सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाचा दबदबा दिसून आला. पहिल्या १० गुणवंतांपैकी ५ जण याच महाविद्यालयाचे आहेत हे विशेष.अन्वय पानगावकर याने ७०० पैकी ६३९ गुण मिळवत उपराजधानीतून दुसरा क्रमांक पटकाविला आहे. त्याचा अखिल भारतीय पातळीवर २६४ वा क्रमांक आहे. याशिवाय सोहम व्यवहारे (६२८), राहुल बजाज (६२०), रिशीका मोदी (६१४), अंशुल पान्चेल (६१३), अनमोल अरोडा (६०१), संकल्प चिमड्यालवार (५८४) यांनीदेखील चमकदार कामगिरी केली आहे. महाविद्यालयातील १२८ विद्यार्थ्यांनी ४०१ ते ६३८ पर्यंत गुण मिळविले आहेत. संस्थेचे संचालक डॉ.राजाभाऊ टांकसाळे, प्राचार्य देवांगना पुंडे, जितेंद्र मूर्ती यांनी गुणवंताचा सत्कार केला.

 

टॅग्स :NEET Result 2018नीट परीक्षा निकाल २०१८nagpurनागपूर