शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

लाडली लक्ष्मी ‘पुन्हा लाडात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुलींचा जन्मदर वाढावा याकरिता केंद्र सरकारच्या ‘आयआरडीए’ने सुरू केलेली ‘लाडली लक्ष्मी’ नागपूर महापालिकेने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मुलींचा जन्मदर वाढावा याकरिता केंद्र सरकारच्या ‘आयआरडीए’ने सुरू केलेली ‘लाडली लक्ष्मी’ नागपूर महापालिकेने राबविली. परंतु, या योजनेंतर्गत देण्यात येणारा लाभ आणखी किती अधिक देता येईल, याकरिता पर्याय तपासण्याचे निर्देश देत तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी योजना बंद केली होती. जोवर अधिकच्या लाभासंदर्भातील पर्याय मिळत नाही, तोवर जुनी योजना राबविण्यात यवी, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी गुरुवारी मनपाच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत दिले.

प्रश्नोत्तराच्या तासात लाडली लक्ष्मी योजना बंद पडल्याचा मुद्दा दिव्या धुरडे यांनी उपस्थित केला. योजना बंद असल्यामुळे अनेक अर्ज प्रलंबित असल्याने ही योजना सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. तत्कालीन आयुक्तांनी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणारा लाभ अधिक कसा करता येईल, याबाबतचा पर्याय शोधण्याकरिता ही योजना बंद केली असून, अर्ज घेणे बंद असून मागील वर्षी ऑगस्टपासून पालिकेने प्रीमिअम भरले नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. विद्यमान आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी देखील तत्कालीन आयुक्तांच्या निर्णयावर सहमती दर्शविली. यावरून प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली. यानंतर शहरातील भ्रूणहत्येची माहिती मागण्यात आली. शहरात अशी कुठलीही घटना घडली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर महापौरांनी हाच योजनेचा मूळ उद्देश असून मुलींचा जन्मदर वाढावा याकरिता योजना असल्याचे सांगत योजना सुरू करण्याचे निर्देश दिले.

....

लाभार्थ्यांपेक्षा कंपन्यांना अधिक लाभ : आयुक्त

लाडली लक्ष्मी योजनेत लाभार्थ्यांना केवळ ५ टक्केच फायदा झाला असून, कंपन्यांनाच लाभ झाला. योजनाही उत्तम आहे; परंतु प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. याचा अभ्यास करण्याची गरज आहे. योजनेंतर्गत रक्कम ही वेगवेगळ्या मार्गाने गुंतविल्यास लाभार्थ्यांना चांगला लाभ देता येऊ शकतो. यात काही वाईट नसून, योजनेत तसे पर्याय असणे गरजेचे असल्याचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.

....

कंपन्याला फायदा झाल्याचा पुरावा काय? - महापौर

‘लाडली लक्ष्मी’ योजनेनुसार ० ते १ वर्ष वयोगटातील शहरातील बीपीएल कुटुंबातील मुलीला लाभ दिला जातो. योजनेतून महापालिकेला नुकसान झाले असेल, लाभार्थ्यांना लाभ मिळाला नसेल आणि कंपन्यांचा फायदा झाला असेल तर तसा कुठला सर्व्हे, अहवाल आहे का? असा सवाल करून नवा पर्याय मिळेल तोवर जुनी योजना जशीची तशी सुरू करण्यात यावी, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

--------------------------