शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

सर्वेतील त्रुटींचा नागपूर मनपाच्या मालमत्ता कर वसुलीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 11:13 PM

मालमत्ता सर्वेतील त्रुटीमुळे करात भरभक्कम वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. याचा विचार करता महापालिकेने मालमत्ता कर आकारण्याच्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. परंतु सर्वेतील त्रुटी व कर आकारणीत वारंवार होणारा बदल याचा कर वसुलीला फटका बसला आहे.

ठळक मुद्दे११४.८८ कोटींची कर वसुली : मार्चपर्यंत उद्दिष्टपूर्ती अशक्य

आॅनलाईन लोकमतनागपूर : मालमत्ता सर्वेतील त्रुटीमुळे करात भरभक्कम वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. याचा विचार करता महापालिकेने मालमत्ता कर आकारण्याच्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. परंतु सर्वेतील त्रुटी व कर आकारणीत वारंवार होणारा बदल याचा कर वसुलीला फटका बसला आहे.मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अधिक वसुली होईल, अशी आशा महापालिका प्रशासनाला आहे. परंतु उद्दिष्टपूर्ती संदर्भात अधिकारी वा पदाधिकारी काहीही बोलायला तयार नाही. ३१ डिसेंबरपर्यत महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ता कराच्या वसुलीतून ११४ क ोटी ८८ लाख ४६२ रु. चा निधी जमा झाला. गेल्या वर्षी याच कालावधीत ११३ कोटी १० लाख १९ हजारांचा निधी जमा झाला होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत १ कोटी ७८ लाखांची अधिक वसुली झाली आहे. परंतु ही वाढ उद्दिष्टाचा विचार करता पुरेशी नाही.आजवर १.६० लाख घरमालकांना डिमांड वाटप करण्यात आले आहे. तातडीने डिमांड वाटप करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न होता. परंतु डिमांडमधील त्रुटी व कर आकारणीत वारंवार होणाºया बदलामुळे कर वसुलीची प्रक्रिया बाधित झाली आहे.कर वसुली व्हावी , म्हणून थकबाकीदारांसाठी अभय योजना राबविण्यात आली. दंडाच्या रकमेत ९० टक्के सूट देण्यात आली. परंतु त्यानंतरही अपेक्षित वसुली झाली नाही. अखेर प्रशासनाने थकबाकीदारांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. यामुळे थोड्या प्रमाणात वसुली झाली. परंतु ती पुरेशी नाही. दुसरीकडे अधिक रकमेच्या डिमांड मिळालेल्यांनी आक्षेप नोंदविले आहेत. त्यांचा कर कमी न करता काही दिवस प्रतीक्षा करण्यास सांगितले जात आहे. या लोकांनी कर भरणे थांबविले आहे. याचाही वसुलीवर परिणाम होत आहे.४२७ कोटींची तूट कशी भरून काढणारप्रमुख आर्थिक स्रोत असलेला एलबीटी आणि जकात बंद झाला आहे. जीएसटी अनुदान म्हणून महापालिकेने शासनाकडे वर्षाला १०६५ कोटी रुपयांची मागणी केली होती. म्हणजे महिन्याला ८८.७५ कोटी रुपये जीएसटी अनुदान अपेक्षित होते. पण, शासनाकडून महिन्याला ५१.३६ कोटी रुपयेच मिळतात. महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा विचार करता जीएसटीच्या अनुदानात वर्षाला ४२७ कोटींची तूट येणार आहे. ही तूट कशी भरून काढावी. असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर