इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत क्यूआर कार्डची कमतरता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 11:52 IST2018-09-06T11:52:09+5:302018-09-06T11:52:51+5:30
१ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेसंदर्भात (आयपीपीबी) माहितीचा अभाव आहे. या बँकेत खात्यासोबत पेमेंटकरिता देण्यात येणाऱ्या क्यूआर कार्डची कमतरता आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत क्यूआर कार्डची कमतरता
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेसंदर्भात (आयपीपीबी) माहितीचा अभाव आहे. या बँकेत खात्यासोबत पेमेंटकरिता देण्यात येणाऱ्या क्यूआर कार्डची कमतरता आहे.
केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी जीपीओमध्ये आयपीपीबीच्या नागपूर शाखेचे उद्घाटन केले होते. यावेळी केवळ १६ क्यूआर कार्ड वाटप करण्यात आले. सध्या देशात १५ लाख कार्डांची कमतरता असल्याचे सूत्रांचे मत आहे. महाराष्ट्रात आयपीपीबीचे एक लाख खाते उघडण्याचे लक्ष्य आहे. त्याअंतर्गत राज्यात आतापर्यंत ३० हजार खाते सुरू झाले आहेत. नागपूर शाखेत चार कर्मचारी कार्यरत असून जीपीओमध्ये पोस्टमन सध्या ११ पोस्टमन कार्र्यरत असून ही संख्या २० असायला हवी.
चर्चेदरम्यान मजूर, कामगार आणि लहानमोठा व्यावसायिकांनी सांगितले की, कार्ड तर मिळाले आहे, पण त्या संदर्भात जास्त माहिती नाही. जीपीओ शाखेचे पहिले कार्डधारक भाजीविक्रेते अंबादास बोपटे यांच्या पत्नीने सांगितले की, पती दररोजच्या उत्पन्नाचा काही वाटा एका सोसायटीत जमा करते. यावर व्याज मिळत नाही. आयपीपीबीमध्ये खाते सुरू केल्यानंतर व्याज मिळेल का, या प्रश्नाावर त्यांनी काहीही माहिती नसल्याचे सांगितले. क्यूआर कार्डचा उपयोग कोणता, यावरही त्या अनभिज्ञ दिसून आल्या.
घाईघाईत झाले काम
आयपीपीबी शाखेच्या पहिल्या दिवशी वाटप केलेल्या १६ कार्डाच्या यादीत दोन खातेदारांचे मोबाईल क्रमांक एकच आहे. यामध्ये एक विद्यार्थी तर दुसरा शेतकरी आहे. नोंदणीत झालेल्या अशा चुकीमुळे खातेधारक आणि कार्डधारकाला त्रास होऊ शकतो. आयपीपीबी कार्डधारकांच्या यादीत मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याचे काम गांभीर्याने केले जाते.