शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

आताच्या तरुण कलावंतांमध्ये संयमाचा अभाव : दिग्दर्शक जाहनू बरुआ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:19 IST

आज इंटरनेटचे युग आहे. ‘वेबसिरीज’सारख्या डिजिटल युगाच्या या नव्या माध्यमाने या क्षेत्राचे आकर्षण असणाऱ्या तरुण कलावंतांना मोठे दालन उघडले आहे. या तरुणांमध्ये कमालीची प्रतिभा आहे, बुद्धिमान आहेत तसेच विचार आणि कृती करण्यातही गतिमान आहेत, ही गोष्ट मान्य करायला हवी. मात्र त्यांच्यात संयमाचा अभाव आहे. त्यांना सर्व काही झटपट हवे आहे आणि ही डिजिटल गती त्यांच्या प्रतिभेतील अडथळाही आहे. त्यामुळे तरुण कलावंतांनी सोप्या मार्गाने झटपट सर्वकाही मिळविण्याची भावना टाळावी, असे आवाहन प्रसिद्ध आसामी चित्रपट दिग्दर्शक जाहनू बरुआ यांनी केले.

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मुलाखत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आज इंटरनेटचे युग आहे. ‘वेबसिरीज’सारख्या डिजिटल युगाच्या या नव्या माध्यमाने या क्षेत्राचे आकर्षण असणाऱ्या तरुण कलावंतांना मोठे दालन उघडले आहे. या तरुणांमध्ये कमालीची प्रतिभा आहे, बुद्धिमान आहेत तसेच विचार आणि कृती करण्यातही गतिमान आहेत, ही गोष्ट मान्य करायला हवी. मात्र त्यांच्यात संयमाचा अभाव आहे. त्यांना सर्व काही झटपट हवे आहे आणि ही डिजिटल गती त्यांच्या प्रतिभेतील अडथळाही आहे. त्यामुळे तरुण कलावंतांनी सोप्या मार्गाने झटपट सर्वकाही मिळविण्याची भावना टाळावी, असे आवाहन प्रसिद्ध आसामी चित्रपट दिग्दर्शक जाहनू बरुआ यांनी केले.ऑरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशन तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, महापालिका, विदर्भ साहित्य संघ व सप्तक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या दुसºया दिवशी प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल व फिल्म गुरू समर नखाते यांनी जाहनू बरुआ यांची मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते. जाहनू बरुआ हे पद्मश्री व पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित दिग्दर्शक आहेत. त्यांनी आसामी आणि हिंदी भाषेत अनेक चित्रपटाचे लेखन आणि निर्मिती केली आहे. यामध्ये ‘हलोधिया चोराये बौधन खोई, फिरींगोटी, खोगोरोलोई बोहू दूर, कोनिकार रामधेनू, बांधोन, अजेयो’ या प्रसिद्ध चित्रपटांसह ‘मैने गांधी को नही मारा’ या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या अनेक क्षेत्रीय चित्रपटांना राष्ट्रीयआणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांच्या एका आसामी चित्रपटाची निर्मितीही ते करीत आहेत.मुलाखतीच्या वेळी ते म्हणाले, प्रतिभा आणि परिश्रम या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. स्पर्धेच्या जगात टिकण्यासाठी प्रतिभेला परिश्रमाची जोड मिळणे तेवढेच आवश्यक आहे. आजही चित्रपटाच्या कथानकावर त्याचे यश अवलंबून असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आसामच्या अनेक कलावंतांनी सिनेक्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यातीलच गायक, गीतकार, संगीतकार व चित्रपट निर्माता भूपेन हजारीका यांचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला. ते द्रोणाचार्य असून मी त्यांचा प्रामाणिक शिष्य ‘एकलव्य’ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ‘तुम्ही जो विचार करता ते खरे नाही आणि खरे नाहीच असे माना व या भूमिकेवर तुम्ही ठाम रहा’, हे अनेक वर्षापूर्वी हजारिका यांचे शब्द आपण आजही पाळत असल्याचे बरुआ यांनी सांगितले.यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक प्रसंगांचा उलगडा करीत या अनुभवामुळेच आज यशापर्यंत पोहचू शकल्याची भावना व्यक्त केली.७ फेब्रुवारीपासून सुरू झालेला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १० फेब्रुवारी पर्यंत चालणार असून यादरमान भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी नागपूरकर चित्रपटप्रेमींना मिळत आहे. महोत्सवात डॉ. जब्बार पटेल व समर नखाते यांच्यासह ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, संदीप मोदी, शिवाजी पाटील, श्रीविनय सुलियन, स्वानंद किरकीरे, श्रीनिवास पोकळे आदी प्रतिभावंत चित्रपट दिग्दर्शक, गायक, अभिनेत्यांचा सहभाग राहणार आहे.

 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयcultureसांस्कृतिक