शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपूर जिल्ह्यात कायनाइट- सिलीमनाइट खनिजाचे साठे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 11:09 IST

चंद्रपूर, यवतमाळमध्ये चूनखडक : राज्य भूवैज्ञानीय कार्यक्रम मंडळाची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: भूविज्ञान व खनिकर्म समन्वेषाच्या १२ भूवैज्ञानीय संचालनालयाद्वारे खनिज सर्वेक्षण व योजनांमुळे नागपूर जिल्ह्यात कायनाइट-सिलीमनाइट या खनिजांचे साठे शोधण्यात आले असून, नागपूर शहर, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात चूनखडक तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात बॉक्साइट खनिजांची विपुल प्रमाणात साठे उपलब्ध असल्याचा शोध घेण्यात आला आहे. परमाणू खनिज संचालनालयातर्फे गोंदिया व छत्तीसगड सीमा क्षेत्रात बिजली रायोलाईट या भूस्तरामध्ये युरेनियम खनिजांची पूर्वेक्षण योजना प्रस्तावित आहे. 

राज्य भूवैज्ञानीय कार्यक्रम मंडळाची ६० वी बैठक अतिरिक्त मुख्य सचिव (खनिकर्म) इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये २०२३-२४ मध्ये संचालनालयातर्फे राबविण्यात आलेल्या योजना, तसेच २०२४-२५ मध्ये प्रस्तावित असलेल्या खनिज सर्वेक्षणाच्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला, यावेळी भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाच्या संचालक अंजली नगरकर, भारतीय भूवैज्ञानीय सर्वेक्षण विभागाचे संचालक नवजित सिंग नैय्यर, एमइसीएलचे प्रदीप कुळकर्णी, माईलचे शुभम अंजनकर, जवाहरलाल नेहरू अॅल्युमिनिअम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटरचे मुख्य वैज्ञानिक प्रवीण गुप्ते, महाराष्ट्र राज्य सुदूर संवेदन उपाययोजना केंद्राचे अजय देशपांडे, वेकोलीचे ओम दत्त, महासंचालक टी.आर. के. राव, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाचे श्रीराम कडू, एस. पी. आवळे, उपसंचालक रोशन मेश्राम उपस्थित होते

गोंदिया- छत्तीसगड क्षेत्रात युरेनियमचे पूर्वेक्षण

  • २०२४-२५ या वर्षात खनिज सर्वेक्षण-पूर्वेक्षणाच्या १५ योजना चंद्रपूर, कोल्हापूर, नागपूर व भंडारा या जिल्ह्यांत राबविण्यात येणार आहे. 
  • मॉईलतर्फे भंडारा व नागपूर जिल्ह्यातील चिखली, डोंगरी बाजार, कांदी व बेलडोंगरी, सतक येथे पूर्वेक्षणाचे काम सुरू आहे. वेकोलीच्या खानींचे सॅटेलाईट सर्वेक्षण करून नकाशावर आरेखन, तसेच खरीप व रब्बी पिकांची नुकसान भरपाई संदर्भात सॅटेलाईट नकाशांचा अभ्यास करण्यात आला आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
टॅग्स :nagpurनागपूरgondiya-acगोंदियाYavatmalयवतमाळchandrapur-acचंद्रपूर