कृपाल तुमाने म्हणतात मी उद्धव साहेबांसोबत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2022 19:04 IST2022-07-07T19:04:29+5:302022-07-07T19:04:57+5:30

Nagpur News शिवसेनेचे १८ पैकी १२ खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात असताना रामटेकचे खा. कृपाल तुमाने यांनी मात्र आपण शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले.

Kripal Tumane says I am with Uddhav Saheb! | कृपाल तुमाने म्हणतात मी उद्धव साहेबांसोबत !

कृपाल तुमाने म्हणतात मी उद्धव साहेबांसोबत !

ठळक मुद्देशिवसेनेमुळे दोनदा खासदार झालो, आणखी काय हवे ?

नागपूर : शिवसेनेचे १८ पैकी १२ खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात असताना रामटेकचे खा. कृपाल तुमाने यांनी मात्र आपण शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले.

‘लोकमत’शी बोलताना खा. तुमाने म्हणाले की, मी शिवसैनिक म्हणून काम करीत आहे. लोकसभेच्या दोन निवडणुका शिवसेनेच्या धनुष्य बाणावर जिंकून आलो. मला शिवसेनेने खूप काही दिले. नेहमी मान-सन्मान मिळाला. सूचविलेले काम दखल घेऊन करून देण्यात आले. शिवसेनेचे कोण १२ खासदार संपर्कात आहेत, हेच अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोणत्याही पुराव्याशिवाय नावे घेतली जातात. आपण गेल्या १५ दिवसांत चार वेळा उद्धवजींची भेट घेतली.

मातोश्रीवर झालेल्या प्रत्येक बैठकीत मी उपस्थित आहे. आता कशाचीही अपेक्षा नाही. जनतेच्या संपर्कात राहून त्यांची कामे करीत आहे. मतदारसंघात गळ्यात शिवसेनेचा भगवा घालून फिरत आहे. तो भगवा काढण्याचा विचारही मनात नाही, असेही खा. तुमाने यांनी स्पष्ट केले.

Web Title: Kripal Tumane says I am with Uddhav Saheb!