कोरेगाव भीमा प्रकरणी विदर्भात तणावपूर्ण बंद; शाळा व बाजारपेठांवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 09:49 IST2018-01-03T09:48:13+5:302018-01-03T09:49:52+5:30
भीमा कोरेगाव येथे सोमवारी झालेल्या हिंसाचाराचे तीव्र पडसादाच्या व महाराष्ट्र बंदच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी विदर्भातील अनेक जिल्ह्यांत तणावपूर्ण शांतता आढळून आली.

कोरेगाव भीमा प्रकरणी विदर्भात तणावपूर्ण बंद; शाळा व बाजारपेठांवर परिणाम
आॅनलाईन लोकमत
नागपूर: अनेक शाळांनी मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुटी घोषित केली तर काही तुरळक ठिकाणच्या शाळा सुरू असल्याचे वृत्त आहे.
नागपूर शहरात पोलिस आयुक्तांनी पत्रक जारी करून नागरिकांना अफवांना बळी न पडण्याचे व समाजविघातक संदेशांना सोशल मिडियावर न पसरविण्याचे आवाहन केले आहे. शहरातील शाळा बंद असल्याने अनेक विद्यार्थी घरी परत जाताना सकाळी दिसून आले. इमामवाडा या भागात टायर जाळण्याच्या घटना आढळल्या. चंद्रपूर जिल्ह्यात गडचांदूर, कोरपना, गोंडंिपंपरी, जिवती येथे कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यातील काही शाळांना सुटी देण्यात आली आहे. गोंदिया व भंडारा जिल्ह्यातही पूर्णपणे बंद पाळला जातो आहे. यवतमाळ शहरातील मार्केट व शाळा बंद ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे. येथे एका शाळेच्या बसवर दगडफेक झाल्याचेही वृत्त आहे.