शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

‘टू स्ट्रोक’च्या धुरामुळे कोंडतोय श्वास!

By admin | Updated: January 25, 2016 04:09 IST

वाहनांमधील धुरामुळे होणारे प्रदूषण हा साऱ्यांचा चिंतेचा विषय बनला आहे. धुरामुळे श्वसनाचे रोग, अस्थमा सारखे

नागपूर : वाहनांमधील धुरामुळे होणारे प्रदूषण हा साऱ्यांचा चिंतेचा विषय बनला आहे. धुरामुळे श्वसनाचे रोग, अस्थमा सारखे आजन्म सतावणारे दुर्धर रोग होतात. आता या प्रदूषणामुळे स्तनाच्या कर्करोगासारखा असाध्य रोग होत असल्याचेही एका संशोधनातून समोर आले आहे. वाढत्या वाहन प्रदूषणाला रोखण्यासाठी दिल्लीत ‘सम-विषम’ वाहतूक व्यवस्थाही सुरू करण्यात आली आहे, असे असताना राज्यात ‘टू स्ट्रोक’ वाहनांचा सर्रास वापर सुरू आहे. या वाहनांमुळे ‘हायड्रो कार्बन’ व ‘कार्बन मोनोक्साईड’ उत्सर्जित होण्याचे प्रमाण मोठे असतानाही शासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.पर्यावरणाकडे झालेल्या दुर्लक्षांमुळे नैसिर्गक संकटांना आपल्याला तोंड द्यावे लागत आहे. शहरातील प्रचंड वृक्षतोड, पाण्याचा अमर्याद उपसा, शहरातील वाहनांचे वाढते प्रमाण हे पर्यावरण शुद्ध राखण्यास घातक ठरत आहे. जल,वायू,ध्वनी यांचे प्रदूूषण तर पर्यावरणाला मारकच आहे. म्हणूनच शासनाने १५ वर्षांपुढील खासगी आणि आठ वर्षांपुढील व्यावसायिक वाहनांवर पर्यावरण कर आकारण्याचे निर्देश दिले आहे. मात्र परिवहन विभाग या कराला घेऊन गंभीर नसल्याचे चित्र आहे. तर, दुसरीकडे ‘टू स्ट्रोक’ वाहने आजही रस्त्यावर मोठ्या संख्येत प्रदूषण पसरवित धावत आहेत. (प्रतिनिधी)विषारी वायू उत्सर्जित होण्याचे प्रमाण सर्वाधिकनुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात दहा ‘टू स्ट्रोक’ आणि दहा ‘फोर स्ट्रोक’ आॅटोरिक्षांच्या प्रदूषणाची पातळी मोजण्यात आली. यात ‘टू स्ट्रोक’ आॅटोरिक्षांमधून मानवी शरीरासाठी घातक असलेला ‘हायड्रो कार्बन’ हा वायू १०७९ ते २६३० पीपीएम तर कार्बन मोनोक्साईड ०.७६ टक्के ते २.४८ टक्के उत्सर्जित होत असल्याची नोंद झाली. याच्या तुलनेत ‘फोर स्ट्रोक’ आॅटोरिक्षामधून ‘हायड्रो कार्बन’ १७४ ते ११ पीपीएम तर ‘कार्बन मोनोक्साईड’ ०.०३ टक्के ते ०.९१ टक्क्यापर्यंतची नोंद झाली. यावरून ‘टू स्ट्रोक’ वाहनातून विषारी वायू उत्सर्जित होण्याचे प्रमाण मोठे असल्याचे समोर आले.एकीकडे ‘युरो-५’ तर दुसरीकडे ‘टू स्ट्रोक’वर्ष २००० मध्ये जेव्हा वाहन प्रदूषणाचा मुद्दा समोर आला तेव्हा युरोपियन देशाचे मानक अवलंबविण्याचा निर्णय घेण्यात आला. २००४ पासून ‘युरो-१, २, ३’ वाहन उत्पादित होऊ लागली. आतातर ‘युरो-५’वर वाहने येत आहेत. शहरात सहा हजारावर टू स्ट्रोक आॅटोशहरात आॅटोरिक्षांची एकूण संख्या १७ हजारावर आहे. यातील ९ हजार ५०० आॅटो ‘ट्रान्सपोर्ट’मध्ये मोडतात. यातील सहा हजारावर आॅटो या ‘टू स्ट्रोक’ तर उर्वरित चार हजार वाहने विविध प्रकारातील असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नुकतेच शहरासाठी नव्या २०७२ आॅटो परवान्याला मंजुरी मिळाली आहे. यामुळे यात पुन्हा ‘टू स्ट्रोक’ वाहनांची भर पडण्याची शक्यता आहे. ‘फोर स्ट्रोक’ आॅटोच्या किमतीत ‘टू स्ट्रोक’ आॅटोची किमत कमी असल्याने आणि हा आॅटो रॉकेलवरही चालविता येत असल्याने शहराच्या प्रदूषणात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. २०१३ मध्ये लावण्यात आली होती बंदी‘कर्नाटक’ राज्यात ‘टू स्ट्रोक’ वाहनाच्या रजिस्ट्रेशनला बंदी आहे. महाराष्ट्रातही ‘टू स्ट्रोक’ वाहनाचे रजिस्ट्रेशन न करण्याचा निर्णय २०१३ मध्ये घेण्यात आला होता. यासाठी वाढते प्रदूषणाचे मुख्य कारण समोर करण्यात आले होते. परंतु नंतर काही महिन्यातच हा निर्णय मागे घेण्यात आला. या निर्णयामुळे नागपूरच नव्हे तर संपूर्ण राज्यात प्रदूषणाची वाढ झाल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.