शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

नागपुरात लुटारू महिलेने घातले चाकूचे घाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 8:19 PM

लुटारू महिला आरोपीने एका व्यक्तीवर चाकूचे घाव घालून त्याच्याजवळचे १२०० रुपये हिसकावून घेतले. भोजराज दशरथ बागडे (वय ५२) असे लुटारूंच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते पारशिवनी (जि. नागपूर) जवळच्या आमडी मोहल्ल्यातील रहिवासी आहेत.

ठळक मुद्देरुपये हिसकावून घेतले : गणेशपेठेतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लुटारू महिला आरोपीने एका व्यक्तीवर चाकूचे घाव घालून त्याच्याजवळचे १२०० रुपये हिसकावून घेतले. भोजराज दशरथ बागडे (वय ५२) असे लुटारूंच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते पारशिवनी (जि. नागपूर) जवळच्या आमडी मोहल्ल्यातील रहिवासी आहेत.बागडे यांची मुलगी राजस्थानमध्ये राहते. मुलीच्या गावाला जाण्यासाठी बुधवारी रात्री बागडे नागपूर रेल्वेस्थानकावर आले. मात्र, राजस्थानला जाणारी रेल्वेगाडी गुरुवारी दुपारी असल्याचे कळल्याने त्यांनी रेल्वेस्थानकावरच रात्र काढली. गुरुवारी सकाळी ९ वाजता ते चहा घेण्यासाठी गणेशपेठेतील राम मंदिराकडे आले. या भागातील बरीचशी दुकाने उघडायची होती. अचानक एक महिला तिच्या साथीदारासोबत बागडेंच्या समोर आले. त्यांनी चाकूचा धाक दाखवून बागडेंच्या खिशातून जबरदस्तीने रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. बागडेंनी जोरदार प्रतिकार केला. ते पाहून आरोपी महिलेने तिच्या जवळचा चाकू बागडेंच्या डोक्यावर आणि पोटरीवर मारून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपींनी बागडेंच्या खिशातील १२०० रुपये हिसकावून पळ काढला. जखमी बागडेंनी रस्त्यावरच्या नागरिकांच्या मदतीने पोलिसांना कळविले. नंतर मेयोत गेले. तेथे उपचारानंतर त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी लुटमार आणि प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे. 

टॅग्स :Robberyदरोडाnagpurनागपूर