क्षुल्लक कारणावरून चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:11 IST2021-08-23T04:11:04+5:302021-08-23T04:11:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण झाल्यानंतर एकाने दुसऱ्यावर चाकूहल्ला करून त्याला जबर जखमी केले. धंतोली ...

Knife attack for trivial reason | क्षुल्लक कारणावरून चाकूहल्ला

क्षुल्लक कारणावरून चाकूहल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण झाल्यानंतर एकाने दुसऱ्यावर चाकूहल्ला करून त्याला जबर जखमी केले. धंतोली पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास ही घटना घडली.

सागर दुर्गेश उईके (वय २८) असे जखमीचे तर आकाश शिवनाथ उईके (वय २३) आरोपीचे नाव आहे. हे दोघेही तकिया धंतोलीत राहतात. सागरचा बॅण्ड आहे. आरोपी आकाशने सागरचा मित्र राहुल याला आकाशसोबत बॅण्ड वाजविण्यास मनाई केली. ते माहीत पडल्यामुळे सागर आकाशला जाब विचारण्यासाठी शोधत होता. शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास आकाश आणि राहुल बिरसा मुंडा हॉलजवळ बसून दिसले. त्यामुळे सागरने आकाशला ‘तू राहुलला माझ्यासोबत बॅण्ड वाजविण्यास मनाई का केली’, अशी विचारणा केली. त्यावरून या दोघांमध्ये वाद झाला. आरोपी आकाशने लगेच चाकू काढून सागरवर हल्ला चढवला. डोक्याला चाकू लागल्याने सागर गंभीर जखमी झाला. आरडाओरड ऐकून आजूबाजूची मंडळी धावली. त्यांनी आरोपीला आवरले. जखमी सागरने दिलेल्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

-----

Web Title: Knife attack for trivial reason