पैसे न दिल्याने किन्नरांचा हल्लाबाेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:13 IST2021-08-18T04:13:28+5:302021-08-18T04:13:28+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क हिंगणा : पैसे न दिल्याने संतापलेल्या किन्नरांच्या टाेळीने नीलडाेह (ता. हिंगणा) येथील घरात प्रवेश केला आणि ...

Kinnar will be attacked for not paying | पैसे न दिल्याने किन्नरांचा हल्लाबाेल

पैसे न दिल्याने किन्नरांचा हल्लाबाेल

लाेकमत न्यूज नेटवर्क

हिंगणा : पैसे न दिल्याने संतापलेल्या किन्नरांच्या टाेळीने नीलडाेह (ता. हिंगणा) येथील घरात प्रवेश केला आणि घरातील साहित्याची ताेडफाेड केली. एवढेच नव्हे तर त्यांनी घरातील महिला व मुलांनाही मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. १७) सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास घडली.

अंकुश हरिभाऊ मुनेश्वर (२७, रा. जुनी वस्ती नीलडाेह, ता. हिंगणा) हा साेमवारी (दि. १६) दुपारी त्यांच्या आईसाेबत घरासमाेर उभे हाेते. चार-पाच किन्नरांनी त्यांना पैसे मागितले. त्यांनी पैसे न दिल्याने किन्नर चिडले व अश्लील हावभाव तसेच शिवीगाळ करीत निघून गेले. हा प्रकार सहन न झाल्याने अंकुशने त्यांच्याशी वादही घातला हाेता.

दरम्यान, मंगळवारी सकाळी अंदाजे २० किन्नर ऑटाेने त्याच्या घराजवळ आले. त्यांनी घरात प्रवेश करीत घरातील टीव्ही, फ्रीज व इतर वस्तूंची तोडफाेड केली. त्यांनी अंकुश व त्याच्या आईला मारहाणही केली. त्यामुळे परिसरातील नागरिक गाेळा झाले हाेते. त्यांनी लगेच एमआयडीसी पाेलिसांना सूचना दिली. प्रभारी ठाणेदार उमेश बेसरकर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले व किन्नरांना ठाण्यात आणले. वृत्त लिहिस्ताेवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती.

Web Title: Kinnar will be attacked for not paying