शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

अपहृत भावंडांची हत्या

By admin | Updated: December 4, 2015 03:03 IST

सख्ख्या भाच्यांचे अपहरण करून एका मामाने दोन निरागस जीवाची हत्या केली; नंतर त्यांचे मृतदेह नदीत फेकून दिल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

मामा बनला कंस : मध्य प्रदेशात आढळले मृतदेहनागपूर : सख्ख्या भाच्यांचे अपहरण करून एका मामाने दोन निरागस जीवाची हत्या केली; नंतर त्यांचे मृतदेह नदीत फेकून दिल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे जरीपटक्यातील कामगारनगरात शोकसंतप्त वातावरण निर्माण झाले आहे.अकबरी खान मोहम्मद इलियाज (वय १३) आणि नुरैन अन्सारी मोहम्मद इलियाज (वय ११), अशी मृत बहीण-भावांची नावे आहेत. हे भावंड जरीपटक्यातील कामगारनगरात राहायचे. त्यांचे आई-वडील मोलमजुरी करतात. इलियाजचा साळा (मेव्हणा) कुतुबुद्दीन ऊर्फ सुहानी अन्सारी (वय २६) सिवनी जिल्ह्यातील छत्तरपूर (मध्य प्रदेश) येथे राहायचा. काही दिवसांपूर्वी तो नागपुरात आला. तो टायर पंक्चरचे दुकान चालवायचा. त्याचा काही दिवसांपूर्वी बहीण आणि जावयाशी वाद झाला. त्यानंतर आरोपी अन्सारीने २७ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता अकबरी आणि नुरैन या दोघांना आपल्या मोटरसायकलवर (एमएच ३१/डीवाय २७५२) बसवले. ताजबागमधून फिरून येऊ, असे म्हणत या नराधमाने घरून बहीण-भावाला (भाच्यांना) सोबत नेले, मात्र नंतर तो परतच आला नाही. त्याचा मोबाईलही बंद होता. त्यामुळे अपहृत बालकांचे वडील इलियाज यांनी २८ नोव्हेंबरला जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मात्र, मामानेच सोबत नेल्यामुळे फारसा गांभीर्याने तपास केला नाही. या नराधमाने छपरा गावाजवळ कंसाचे रूप धारण करून आपल्या दोन भाच्यांची हत्या केली. त्यांचे मृतदेह नदीच्या पात्रात फेकून तो पळून गेला. २९ नोव्हेंबरला मृतदेह मिळाल्यानंतर तेथील पोलिसांनी ओळख पटविण्याऐवजी मृतदेहावर अंत्यसंस्कारही करून टाकले. दरम्यान, राज्य पोलिसांकडून मिसिंगच्या माहितीवरून या दोन बालकांची माहिती मध्य प्रदेश पोलिसांना कळाल्याने ते नागपुरातील बालके असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी गुरुवारी जरीपटका ठाण्यात संपर्क साधला. ठाणेदार संजय सांगळे यांनी पोलीस पथक छपराकडे रवाना केले. मृत बालकांचे आई-वडील आणि नातेवाईक तिकडे रवाना झाले होते. या घटनेची माहिती कामगारनगरात पसरताच तीव्र शोककळा पसरली. या अपहरण आणि दुहेरी हत्याकांडामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आरोपीही फरार आहे. (प्रतिनिधी)