शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
3
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
4
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
5
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
6
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
7
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
8
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
9
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
10
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
11
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
12
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
13
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
14
‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग
15
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत
16
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
17
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
18
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
19
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

मनीष श्रीवास अपहरण आणि हत्याकांड : सफेलकर टोळीवर मकोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 23:15 IST

MCOCA against Safelkar's gang गँगस्टर रणजित सफेलकर आणि त्याच्या टोळीतील गुंडांविरुद्ध शहर पोलिसांनी मकोका लावला आहे. विशेष म्हणजे, सफेलकरच्या टोळीतील एक डझनावर गुंड फरार असून, पोलीस त्यांचा जागोजागी शोध घेत आहेत.

ठळक मुद्दे फरार साथीदारांची शोधाशोध सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - गँगस्टर रणजित सफेलकर आणि त्याच्या टोळीतील गुंडांविरुद्ध शहर पोलिसांनी मकोका लावला आहे. विशेष म्हणजे, सफेलकरच्या टोळीतील एक डझनावर गुंड फरार असून, पोलीस त्यांचा जागोजागी शोध घेत आहेत.

कुख्यात सफेलकर याने नागपूर आणि आजूबाजूच्या भागातील अनेक जमिनी, दुकाने बळकावली असून, कोट्यवधींची माया जमविली आहे. अपहरण, हत्या, धमकी, खंडणी वसुली असेही गुन्हे सफेलकर आणि त्याच्या टोळीतील गुंड नेहमीच करीत होते. प्रतिस्पर्धी गुन्हेगारांना संपवण्याचाही कट रचत होते आणि सुपारी घेऊन हत्याही करत होते. आर्किटेक्ट एकनाथ निमगडेची हत्या सफेलकरने पाच कोटी रुपयाची सुपारी घेऊन कुख्यात नब्बू आणि साथीदारांकडून करवून घेतली. तत्पूर्वी मनीष श्रीवास नामक गुंडाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याचे अपहरण केले आणि नंतर हत्या केली. ४ मार्च २०१२ ला घडलेल्या या हत्याकांडाबाबत कुणीच काही सांगायला, बोलायला तयार नसल्याने सफेलकर टोळी कमालीची निर्ढावली होती. मात्र, पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून

सफेलकरच्या पापाचा घडा फोडून त्याच्या आणि त्याच्या टोळीतील कालू तसेच भरत हाटे आणि हेमंत गोरखा या तिघांना अटक केली. ईसाक मस्ते, छोटू बागडे आणि अन्य साथीदार फरार आहेत. अटकेतील आरोपींच्या कबुलीजबाबावरून पोलीस आयुक्तांनी सफेलकर टोळीविरुद्ध मकोका लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार मकोकाचा गुन्हा लावण्यात आला असून, त्याचा तपास आता एसीपी बी.एन. नलावडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

कोट्यवधीच्या जमिनीवर कब्जा - ५० लाखाची खंडणी मागितली

 भिलगाव येथील डुमन श्रावण प्रगट (वय ५१) यांच्या ढाबा असलेली कोट्यवधीच्या जमिनीवर साथीदाराच्या माध्यमातून कब्जा मारून तो खाली करण्यासाठी ५० लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे शाखेने रणजित सफेलकर, शरद आणि कालू हाटे तसेच जितेंद्र कटारिया या चाैघांवर गुन्हा दाखल केला. निमगडे आणि मनीष श्रीवास हत्याकांड उघड झाल्यानंतर सफेलकर टोळीविरुद्ध या आठवड्यात दाखल झालेला हा दुसरा गुन्हा होय. आणखी सुमारे डझनभर पीडित आपापले गाऱ्हाणे घेऊन गुन्हे शाखेत पोहचले आहेत. त्यामुळे सफेलकर टोळीविरुद्ध आणखी डझनभर गुन्हे दाखल होऊ शकतात. आम्ही या सर्व प्रकरणांची सखोल चाैकशी करीत असल्याचे गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMCOCA ACTमकोका कायदा