खर्रा खायला जाणे जीवावर बेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:26 AM2020-12-14T04:26:49+5:302020-12-14T04:26:49+5:30

काेंढाळी : जिनिंगमधून खर्रा खाण्यासाठी राेडने पायी येत असलेल्या दाेघांना वेगात आलेल्या ट्रकने उडविले. त्यात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

Kharra eating is fatal | खर्रा खायला जाणे जीवावर बेतले

खर्रा खायला जाणे जीवावर बेतले

Next

काेंढाळी : जिनिंगमधून खर्रा खाण्यासाठी राेडने पायी येत असलेल्या दाेघांना वेगात आलेल्या ट्रकने उडविले. त्यात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना काेंढाळी (ता. काटाेल) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदाेरा फाटा परिसरात नुकतीच घडली.

नेपाल मेघवाल असे मृताचे तर रमेश परिहार असे जखमीचे नाव आहे. दाेघेही नांदाेरा शिवारातील जिनिंगमध्ये कामगार म्हणून काम करतात. त्यांना खर्रा खायचा असल्याने ते जिनिंगमधून पायी काेंढाळीच्या दिशेने निघाले हाेते. त्यातच मागून अर्थात अमरावतीहून नागपूरच्या दिशेने वेगात जाणाऱ्या ट्रकने दाेघांनाही धडक दिल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर काेंढाळी येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात प्रथमाेपचार केल्यानंतर नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे नेपालचा उपचाादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध भादंवि २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक ढगे करीत आहेत.

Web Title: Kharra eating is fatal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.