खान यांना सक्तीची सेवानवृत्ती
By Admin | Updated: May 31, 2014 00:58 IST2014-05-31T00:58:41+5:302014-05-31T00:58:41+5:30
जन्मतारखेची चुकीची माहिती देऊ न महापालिका प्रशासनाची दिशाभूल केल्याची गंभीर दखल घेत आयुक्त श्याम वर्धने यांनी शुक्रवारी मनपाचे वाहतूक अभियंता नसीर खान यांना सक्तीने सेवानवृत्त करण्याचे आदेश काढले.

खान यांना सक्तीची सेवानवृत्ती
मनपा आयुक्तांची कारवाई : वेतनाची रक्कम वसुलणार
नागपूर : जन्मतारखेची चुकीची माहिती देऊ न महापालिका प्रशासनाची दिशाभूल केल्याची गंभीर दखल घेत आयुक्त श्याम वर्धने यांनी शुक्रवारी मनपाचे वाहतूक अभियंता नसीर खान यांना सक्तीने सेवानवृत्त करण्याचे आदेश काढले.
सोबतच ऑक्टोबर २0१३ ते मे १४ दरम्यान खान यांनी उचल केलेली वेतनाची रक्कम त्यांचेकडून वसूलण्याचे निर्देशही दिले आहे. जन्मतारखेच्या मूळ दाखल्यानुसार १५ सप्टेंबर २0१३ रोजी खान यांचे वय ५८ वर्षे होते. परंतु त्यांनी प्रशासनाला जन्मतारखेची चुकीची माहिती दिली होती. या संदर्भात तक्र ार प्राप्त झाल्याने मनपा प्रशासनाने खान यांना जन्मतारखेचा मूळ दाखला सादर करण्याचे निर्देश दिले होते. या प्रकरणी चौकशी करण्याची जबाबदारी अपर आयुक्त हेमंत पवार यांच्यावर सोपविली होती. त्यांच्या चौकशी अहवालानुसार आयुक्तांनी ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार नसीर खान यांचा जन्म १५ सप्टेंबर १९५५ साली झाला. त्यानुसार खान मनपा सेवेतून १५ सप्टेंबर २0१३ रोजी सेवानवृत्त व्हायला हवे होते. परंतु खान यांनी नागपूर पॉलिटेक्निकच्या जन्मतारखेचा दाखला दिला. त्यावर त्यांची जन्मतारीख १५ सप्टेंबर १९५८ आहे. त्या आधारे त्यांनी चौथीपर्यंंतचे शिक्षण वयाच्या १0 वर्षातच पूर्ण केले होते. खान यांनी प्रशासनाची दिशाभूल केल्याचे स्पप्ट झाल्याने वर्धने यांनी त्यांना सक्तीने सेवानवृत्त करण्याचे आदेश काढले. गतकाळात मिळकतीच्या तुलनेत अधिक संपत्ती बाळगल्याप्रक रणी खान यांना निलंबितही करण्यात आले होते. (प्रतिनिधी)