खंडोबा देवस्थानाचा चंपाष्टमी महोत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:26 IST2020-12-15T04:26:14+5:302020-12-15T04:26:14+5:30

नागपूर : विदर्भातील एकमेव व प्राचीन भोसलेकालीन श्री खंडोबाचे मंदिर कॉटन मार्केट येथे आहे. मार्गशीर्ष प्रतिपदा म्हणजे मंगळवार १५ ...

Khandoba temple's Champashtami festival canceled | खंडोबा देवस्थानाचा चंपाष्टमी महोत्सव रद्द

खंडोबा देवस्थानाचा चंपाष्टमी महोत्सव रद्द

नागपूर : विदर्भातील एकमेव व प्राचीन भोसलेकालीन श्री खंडोबाचे मंदिर कॉटन मार्केट येथे आहे. मार्गशीर्ष प्रतिपदा म्हणजे मंगळवार १५ डिसेंबरपासून येथे षडरात्रोत्सवाला सुरुवात होते. तसेच २० डिसेंबर रविवारला होणारी चंपाष्टमी महोत्सव कोरोनामुळे आणि प्रशासनाची परवानगी नसल्यामुळे रद्द करण्यात आली आहे. याची नोंद घेण्याचे आवाहन देवस्थान कमिटीचे अध्यक्ष न. ना. ठेंगडी, सचिव संजय सावंत, मनोहर कबले, माजी नगरसेवक मनोज साबळे, मोहन जाधव, जयसिंग राजे भोसले, हेमंत शिर्के, राजकुमार शिर्के यांनी केले आहे.

ऑटोचालकांमुळे रेल्वेस्थानकासमोर वाहतुकीची कोंडी

नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर पश्चिमेकडील भागातून खाली उतरल्यानंतर प्रवासी बाहेर पडण्यासाठी असलेल्या दारातून बाहेर पडतात. परंतु या दाराच्या समोरच ऑटोचालक मोठ्या संख्येने उभे राहतात. त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी रस्ता उरत नाही. ऑटोचालक आपले ऑटो रस्त्यावरच उभे करतात. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे शहर वाहतूक पोलिसांनी या ऑटोचालकांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

...........

Web Title: Khandoba temple's Champashtami festival canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.