शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

नागपूर कारागृहात पैसे घेऊन गांजा पुरविण्याचे ‘खाकी’चे रॅकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2022 08:15 IST

Nagpur News नागपूर मध्यवर्ती कारागृहात पैसे घेऊन गांजा पुरविण्याच्या रॅकेटचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. या रॅकेटमध्ये कारागृहातीलच दोन कर्मचारी समाविष्ट होते.

ठळक मुद्देदोन पोलीस कर्मचाऱ्यांसह कैद्यांवर गुन्हा दाखल खाद्यपदार्थ, कपडे पुरविण्याचेदेखील ठरले होते दर

योगेश पांडे नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहात पैसे घेऊन गांजा पुरविण्याच्या रॅकेटचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. या रॅकेटमध्ये कारागृहातीलच दोन कर्मचारी समाविष्ट होते. त्यांच्यासह कैद्यांविरोधात गुन्ह्याची नोंद करत त्यांना अटक करण्यात आली आहे. अजिंक्य राठोड व प्रशांत राठोड अशी कर्मचाऱ्यांची नावे असून निषिद वासनिक, वैभव तांडेकर, श्रीकांत थोरात, गोपाळ पराते व राहुल मेंढेकर हे कैदी यात सहभागी होते. यातील कर्मचारी, श्रीकांत, गोपाळ व राहुल यांना अटक करण्यात आली आहे.

निषिद व वैभव हे या रॅकेटचे सूत्रधार होते. निषिद हा कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणात आत आहे. मागील दोन वर्षांपासून ते तुरुंगात आहेत. त्यांनी त्यांच्या रॅकेटसाठी अजिंक्य व प्रशांत राठोड यांना हाताशी धरले होते. दोघेही त्यांना त्यांच्यासाठी व इतर कैद्यांसाठी बाहेरून गांजा, खाद्यपदार्थ, कपडे, पैसे आणायला सांगायचे. कारागृहातील हे कर्मचारी काही दिवसां्गोदरच सुटका झालेले गुन्हेगार श्रीकांत, गोपाल व राहुल यांना संबंधित सामान आणायला सांगायचे. गेल्या अनेक दिवसांपासून हे रॅकेट सुरू होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना मंगळवारी या रॅकेटची टीप मिळाली. त्यानंतर त्यांनी गुन्हे शाखेचे पथक व सायबर सेलच्या मदतीने तपास सुरू केला. तुरुंगातून एक सीम कार्ड ऑपरेट होत होते अशी माहिती यातून समोर आली. पोलिसांनी संबंधित कॉलर्सची चौकशी केली व व्हॉट्सअपदेखील तपासले असता त्यातून हा भंडाफोड झाला. धंतोली पोलिस ठाण्यात गुन्हेगारी कट, फसवणूक, बनावट कागदपत्रे बनवणे अशा गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

सामानांचे ठरले होते ‘रेटकार्ड’मागील एका महिन्यापासून हा प्रकार सुरू होता. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार बाहेरून तुरुंगात सामान आणायचे ‘रेटकार्ड’देखील ठरले होते. गांजा आणायचे पाच हजार, खाद्यपदार्थांचे दोन ते तीन हजार तर कपडे व स्वेटर आणण्यासाठी हजार रुपये घेतल्या जायचे.

तुरुंगात परत मोबाईलकारागृहात गांजा आढळल्यानंतर पोलिसांनी सखोल झडती घेतली होती. त्यादरम्यान मोबाईल वापरण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर परत कारागृहात मोबाईल जाणे ही चिंताजनक बाब आहे. कारागृहातून सीमकार्ड ऑपरेट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र पोलिसांना मोबाईल मात्र सापडला नाही.

साक्षीदारांनादेखील धमक्यानागपूर कारागृहात बंद असलेले बहुतांश बडे गुन्हेगार या रॅकेटमध्ये सामील आहेत. अंमली पदार्थ आणि चैनीच्या वस्तू मागवण्याबरोबरच ते पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यातील साक्षीदारांना धमकावत असे. व्हॉट्सअपच्या तपासात असे अनेक मॅसेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही. यात काही अधिकारीदेखील सहभागी आहेत का याचा शोध सुरू आहे.

टॅग्स :jailतुरुंग