शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

केरळातील पुराचा फटका गरम मसाल्यांना बसणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 10:51 IST

केरळमधील नैसर्गिक आपत्तीचा फटका स्वयंपाकघरातील मसाल्यांच्या पदार्थांना बसला आहे. केरळमधून संपूर्ण देशात जाणाऱ्या मसाल्यांचे भाव २० ते ३० टक्क्यांनी कडाडले आहेत. त्यामुळे स्वयंपाकघरातील तडका महागला आहे.

ठळक मुद्देकेरळमध्ये गोदामातील माल पावसामुळे खराब

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केरळमधील नैसर्गिक आपत्तीचा फटका स्वयंपाकघरातील मसाल्यांच्या पदार्थांना बसला आहे. केरळमधून संपूर्ण देशात जाणाऱ्या मसाल्यांचे भाव २० ते ३० टक्क्यांनी कडाडले आहेत. त्यामुळे स्वयंपाकघरातील तडका महागला आहे.काळीमिरे, सुंठ, जायपत्री, विलायची, जायफळ, तेजपान, दालचिनी, लवंग आणि सुक्यामेव्याच्या भावातही वाढ झाली आहे, शिवाय खोबरेल तेलाची आवकही कमी झाली आहे. सणासुदीचे दिवस आणि केरळची परिस्थिती सुरळीत होण्यास आणखी काही महिने लागणार असल्यामुळे ग्राहकांना मसाले जास्त भावातच खरेदी करावे लागतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

खोबरेल तेलाची आवक घटलीयंदा काही महिन्यांपूर्वी केरळ आणि कर्नाटक राज्यातील मसाल्यांच्या पदार्थांची आवक वाढल्यामुळे किमती काही प्रमाणात कमी झाल्या होत्या. पण केरळातील पुराचा परिणाम पदार्थांच्या किमतीवर पडला. कोकण आणि केरळातून खोबरे व तेलाची आवक होते. खोबरेल तेलाची केरळमधून होणारी आवक थांबली असली तरीही राज्यात व्यापाऱ्यांकडे साठा आहे. अन्य राज्यातूनही तेल येत असल्यामुळे किमतीवर फारसा परिणाम झाला नाही. पण केरळातील स्थिती सुधारली नाही तर खोबरेल तेल महागण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.मसाल्यात तेजीची शक्यतासंतोष सेल्स कॉर्पोरेशनचे संचालक जगदीश बत्रानी यांनी सांगितले की, केरळ येथील गोदामांमध्ये साठविलेला माल भिजला असून, हाती आलेले पीकही नष्ट झाल्याने पुढील काही महिने केरळमधून येणाऱ्या मसाल्यांच्या भावात तेजी राहण्याची शक्यता आहे. येत्या काळात भावात कोणत्याही प्रकारची घट होण्याची शक्यता नाही. महाराष्ट्रात श्रावण महिन्यासोबत सणवार सुरू होतात. त्यामुळे मसाला पदार्थांची मागणीदेखील वाढते. मात्र पुरवठा कमी असल्यामुळे मसाल्यांचे भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. दरवाढीसोबतच विलायची ६०० ते ६५० रुपये किलो, लवंग ५७० रु., जायफळ १७० रु., तेजपान ५० ते १०० रुपये भाव आहेत. याशिवाय सुक्यामेव्याचे भावही वाढले आहेत. काजू ८०० ते ८५० रुपये किलो, बदाम ७०० ते ७५० रुपये आणि आक्रोड-बी ९०० रुपये किलो विकल्या जात आहे.मसाल्यांचे उत्पादन तामिळनाडू, कनार्टक, मध्य प्रदेशात घेतले जाते. पण केरळच्या तुलनेत हे प्रमाण फारच कमी आहे. राज्यात विलायची आणि जायफळाचा हंगाम जोरात सुरू आहे. या पिकांसाठी पोषक वातावरण तयार झाल्यामुळे, यंदा चांगले उत्पादन मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या उत्पादनावर पाणी फेरले आहे.

 

 

टॅग्स :foodअन्न