सखींनी बांधल्या सैनिकांना राख्या

By Admin | Updated: August 11, 2014 00:51 IST2014-08-11T00:51:28+5:302014-08-11T00:51:28+5:30

लोकमत सखी मंच कामठीच्यावतीने रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त सखी मंचच्या सदस्यांनी कामठी येथील सैनिक प्रशिक्षण केंद्रातील छात्रसेना अधिकारी व सैनिक बांधवांना राख्या बांधल्या.

Keep records of the soldiers built by the witches | सखींनी बांधल्या सैनिकांना राख्या

सखींनी बांधल्या सैनिकांना राख्या

लोकमत सखी मंचचे कामठीत रक्षाबंधन
कामठी : लोकमत सखी मंच कामठीच्यावतीने रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त सखी मंचच्या सदस्यांनी कामठी येथील सैनिक प्रशिक्षण केंद्रातील छात्रसेना अधिकारी व सैनिक बांधवांना राख्या बांधल्या.
रविवारी सकाळच्या सुमारास लोकमत सखी मंचच्या संयोजिका नेहा जोशी यांच्या मार्गदर्शनात नागपुरातील सखींनी कामठी छात्रसेना प्रशिक्षण केंद्रातील लेफ्टनंट कर्नल (प्रशासन अधिकारी) मनीष सक्सेना यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सखींनी सैनिक बांधवांना राखी बांधून बहीण-भावाच्या अतूट बंधनाचे दर्शन घडविले. यावेळी मनीष सक्सेना म्हणाले, लोकमत सखी मंचच्या सदस्यांनी सैनिक प्रशिक्षण केंद्रातील सैनिकांना राख्या बांधल्याने त्यांचे मनोधैर्य उंचावले आहे.
पंजाबमधून आलेले नायक सुभेदार, रायबरेली (उत्तरप्रदेश) येथील सुभेदार मेजर व्ही. श्रीवास्तव, नेपाळ येथील सुभेदार जितेंद्र आले, हिमाचल प्रदेशातील आॅफिसर्स कॅडेड विकास, लुधियानाचे हवालदार जरनैलसिंग, अलाहाबादचे हवालदार अरुणकुमार यांनीही यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
रक्षाबंधन हा सण आपण आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करीत असल्याचा आनंद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमामुळे बहुतांश अधिकारी व सैनिक भारावून गेले होते. सर्वांनी सखी मंचच्या या उपक्रमांची प्रशंसा करीत आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन संयोजिका नेहा जोशी यांनी केले.आयोजनासाठी सुरूज धोंडे यांनी सहकार्य केले.
विद्यार्थ्यांनी पाठविलेल्या राख्या बांधल्या
देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांना कर्तव्याच्या भावनेतून अनेक विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या लोकमतच्या माध्यमातून सैनिकांना पोहचविल्या. यावर्षी लोकमतला प्रागतिक महाविद्यालय कोराडी, धनवटे नॅशनल कॉलेज, मूकबधिर विद्यालय सावनेर, अकोला लोकमत कार्यालय, जिल्हा परिषद प्रा. शाळा उपरवाही, कळमेश्वर येथून राख्या प्राप्त झाल्या. सखी मंचच्या सदस्यांनी या राख्या सैनिकांना बांधून विद्यार्थ्यांमध्ये सैनिकांप्रति असलेल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सुरज दोंडे यांचे सहकार्य लाभले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Keep records of the soldiers built by the witches