जनतेच्या समस्या डोळ््यासमोर ठेवा

By Admin | Updated: December 19, 2014 00:47 IST2014-12-19T00:47:25+5:302014-12-19T00:47:25+5:30

सर्व मंत्री व आमदारांनी आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर सर्वांचे चहापान झाले. यानंतर येथील महर्षी व्यास

Keep public issues in mind | जनतेच्या समस्या डोळ््यासमोर ठेवा

जनतेच्या समस्या डोळ््यासमोर ठेवा

मंत्री आमदारांना संघाचा उपदेश
नागपूर : सर्व मंत्री व आमदारांनी आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर सर्वांचे चहापान झाले. यानंतर येथील महर्षी व्यास सभागृहात आमदारांचे नागपूर महानगर संघचालक डॉ.दिलीप गुप्ता यांनी ‘बौद्धिक’ घेतले. संघ विचारधारा, कार्यप्रणाली, चालणारे उपक्रम यांची माहिती देण्यात आली. शिवाय मंत्री व आमदारांकडून संघाच्या कशा पद्धतीच्या कामाच्या अपेक्षा आहेत याबद्दलदेखील मार्गदर्शन करण्यात आले अशी माहिती सूत्रांनी दिली. लोकप्रतिनिधींनी जनतेच्या समस्या डोळ््यासमोर ठेवूनच काम करावे अशा सूचनादेखील देण्यात आल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Keep public issues in mind