शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

काटोल-नागपूर प्रवास होणार अवघ्या ३५ मिनिटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 11:11 AM

रेल्वेमार्गाच्या ब्रॉडगेज लाईनवर मेट्रोच्या वातानुकूलित कोचेस (ब्रॉडग्रेज मेट्रो) नागपूरवरुन काटोलपर्यंत संचालित करण्याच्या प्रस्तावित प्रकल्पामुळे काटोल ते नागपूर अंतर ३५ मिनिटात गाठणे शक्य होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक,महामार्ग व जलसंपदा नितीन गडकरी यांनी केले.

ठळक मुद्दे ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्पामुळे मिळेल गती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेमार्गाच्या ब्रॉडगेज लाईनवर मेट्रोच्या वातानुकूलित कोचेस (ब्रॉडग्रेज मेट्रो) नागपूरवरुन काटोलपर्यंत संचालित करण्याच्या प्रस्तावित प्रकल्पामुळे काटोल ते नागपूर अंतर ३५ मिनिटात गाठणे शक्य होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक,महामार्ग व जलसंपदा नितीन गडकरी यांनी केले. काटोल नगर परिषदेच्या शताब्दी महोत्सव वर्षानिमित्त काटोल स्थित नगर परिषद शाळा क्रमांक ११ च्या मैदानावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे विविध विकासकार्याच्या लोकार्पण व भूमिपूजनाप्रसंगी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, रामदास तडस, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, काटोल पंचायत समितीचे सभापती संदीप सरोदे, नगरपालिकेचे सत्तापक्षा नेते चरणसिंग ठाकूर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव उपास्थित होते.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे नागपूर-काटोल या चार पदरी सिमेंट काँक्रिट रस्त्याचे सुमारे १२१४ कोटी रुपयाच्या तरतुदीने होणाऱ्या बांधकामाचे ई-भूमिपूजन यावेळी गडकरींच्या हस्ते करण्यात आले. यासोबतच ८४ कोटी रुपयांच्या तरतुदीने नागपूर जिल्ह्यातील नरखेड, घुबडमेट, झिल्पा, सावनेर रस्त्याची सुधारणा व ४०.३१ कोटी रुपयाच्या निधीच्या तरतुदीने केंद्रीय पर्यटन विकास मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन योजनेंतर्गत वाकी, आदासा, धापेवाडा,पारडासिंगा तेलंखेडी व गिरड या तीर्थक्षेत्राच्या विकासकार्यांचेही ई-भूमिपूजन यावेळी करण्यात आले.गडकरी म्हणाले, काटोल वरुड रस्त्याच्या कामात वर्धा नदीतील गाळ काढल्याने त्याचे रुंदीकरण व खोलीकरण तर झालेच पण या गाळातील मुरुम व माती रस्ते निर्मितीमध्ये वापरला जात आहे. यामुळे जलसंवर्धन होऊन जलसाठा वाढत आहे. काटोलमधील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी टेबल फ्रूट आकाराच्या संत्र्यांच्या लागवडीसाठी ठिबक सिंचनाचा अवलंब करुन संत्र्याच्या कलमामध्ये सुधारणा करुन त्याचे निर्यात मूल्य वाढविण्याचे आवाहन गडकरी यांनी केले.केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना काटोल तालुक्यात यशस्वीपणे राबविल्या जात असून पंतप्रधान आवास योजना, कामगार योजनेचे कार्ड या सर्व योजनांसाठी निधीची तरतूद केली जात आहे. जिल्हा नियोजन निधीतून सुमारे १२५ कोटी रुपयाची तरतूदही काटोल तालुक्यासाठी करण्यात येणार असल्याचे आश्वासन चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रसंगी दिले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी