काटोल,हिंगण्यात संक्रमण कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:10 IST2020-12-22T04:10:05+5:302020-12-22T04:10:05+5:30

काटोल/हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि हिंगणा तालुक्यात कोरोनाचे संक्रमण कायम आहे. ग्रामीण भागात बाधितांच्या संख्येत घट झाली असली ...

Katol, Hinganya infection persists | काटोल,हिंगण्यात संक्रमण कायम

काटोल,हिंगण्यात संक्रमण कायम

काटोल/हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि हिंगणा तालुक्यात कोरोनाचे संक्रमण कायम आहे. ग्रामीण भागात बाधितांच्या संख्येत घट झाली असली तरी चाचण्यांचेही प्रमाण कमी झाले आहे. सोमवारी जिल्ह्यातील १३ तालुक्यात ३६ रुग्णांची नोंद झाली. काटोल तालुक्यात ७२ नागरिकांच्या चाचण्या घेण्यात आल्या. तीत काटोल शहरातील शारदा चौक येथे दोन तर पंचवटी येथे एका रुग्णाची नोंद झाली. ग्रामीण भागात कोंढाळी, कलमुंडा आणि तांदूळवाडी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. हिंगणा तालुक्यात ६८ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत डिगडोह येथे दोन रुग्णांची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत ३,७४८ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ३,६०० रुग्ण बरे झाले आहेत. तालुक्यात आतापर्यंत ८९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Web Title: Katol, Hinganya infection persists