शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

काश्मीरचा हिंसाचार निव्वळ एक ड्रामा; मेजर गौरव आर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 11:32 AM

काश्मीरच्या हिंसाचाराला केवळ तेथील राजकीय नेते मेहबुबा मुफ्ती आणि फारुक अब्दुल्ला हेच जबाबदार आहेत.

ठळक मुद्देदगडफेक करणाऱ्यांना मिळतात पैसे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काश्मीरच्या हिंसाचाराला केवळ तेथील राजकीय नेते मेहबुबा मुफ्ती आणि फारुक अब्दुल्ला हेच जबाबदार आहेत. या हिंसाचारामुळे त्यांचा तिजोऱ्या भरत आहे. त्यांना तिथे कधीच शांतता नको आहे. काश्मीरबद्दलची देशाची ठोस पॉलिसी नसल्यामुळे हिंसाचाराचा ड्रामा वर्षानुवर्षे सुरू असल्याचे मत मेजर गौरव आर्य यांनी व्यक्त केले.जम्मू काश्मीर स्टडी सर्कलद्वारे काश्मीर विलय दिवसानिमित्त मेजर गौरव आर्य यांच्या व्याख्यानाचे आयोजन मंगळवारी चिटणवीस सेंटर येथे करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष म्हणून मीरा खडक्कार व स्टडी सर्कलचे संचालक मनु नायर उपस्थित होते. यावेळी त्यांनी काश्मीरच्या अवस्थेवर भाष्य करीत, तिथे सुरू असलेल्या हिंसाचाराला तेथील नेतेच खतपाणी घालत असून हा निव्वळ पॉलिटिकल ड्रामा असल्याचे म्हणाले. काश्मीरच्या आतंकवादाबद्दल बोलताना ते म्हणाले की, १९८९ च्या सुमारास काश्मिरात पाकिस्ताना आतंकवाद फोफावला. त्यावेळी १० हजारावर आतंकवादी काश्मिरात शिरले होते. उघड्यावर एके-४७ व पाकिस्तानचा झेंडा फडकवित होते. त्यावेळी भारतीय सेनेने सरकारला एक डॉक्युमेंट पाठविले.सरकारने ते मान्य केल्यानंतर भारतीय सेनेने राष्ट्रीय रायफल सेना तयार करून पाठविली. या सेनेने आंतकवाद्यांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर दिले. राष्ट्रीय रायफ ल सेनेने तेव्हा दररोज शेकडो एन्काऊंटर काश्मिरात केले.आज तर काश्मिरात दीडशेही आंतकवादी नाहीत. त्यामुळे पाकिस्तानने तिथे आता इस्लामिक आयडॉलॉजी वापरणे सुरू केले आहे. काश्मिरात गेल्या १० वर्षात शेकडो मदरसे बनले आहे. यातून हिंसा शिकविली जात आहे. हिंसाचारासाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर सुरू आहे. हिंसाचारात दगडफेक, जाळपोळ करण्यात येते, त्यांना पैसे दिले जात आहे. काश्मिरातले हे दोन्ही नेते त्यास जबाबदार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

- तर १५ वर्षे हवी राष्टपती राजवटभारत सरकारला काश्मीरचा आतंकवाद संपवायचा असेल तर राष्ट्रपती राजवट किमान १० ते १५ वर्षासाठी लावली पाहिजे. हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या मदरशांना, सोशल मीडियातून हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या यंत्रणांवर निर्बंध लावावे लागेल. सर्जिकल स्ट्राईक करून फायदा नाही, तर पाकिस्तानी सेनेवर जबर हल्ला करणे गरजेचे आहे, असे आर्य म्हणाले.

टॅग्स :Defenceसंरक्षण विभाग