शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

काशीरामचा सांगाडा मिळाला

By admin | Updated: May 24, 2014 01:08 IST

देव्हाडी येथील काशीराम कुकडे यांच्या हत्या प्रकरणी शुक्रवारी सकाळी ११.३० च्या सुमारास रेल्वे तलावातून मृत काशिरामचा सांगाडा मिळाला. आरोपींनी दाखविलेल्या स्थळाच्या मदतीने पोलिसांनी

२९ पर्यंत पीसीआर : प्रकरण बंद घरातील मानवी अवशेषाचे

तुमसर (जि.भंडारा) : देव्हाडी येथील काशीराम कुकडे यांच्या हत्या प्रकरणी शुक्रवारी सकाळी ११.३० च्या सुमारास रेल्वे तलावातून मृत काशिरामचा सांगाडा मिळाला. आरोपींनी दाखविलेल्या स्थळाच्या मदतीने पोलिसांनी तलावातील तीन ठिकाणाहून विखुरलेल्या स्थितीतील हाडे हस्तगत केली. ही हाडे ३० ते ३५ टक्केच आहेत. फेब्रुवारी २०१३ मध्ये फावड्याने काशिरामचा खून करण्यात आला. घर तलाव परिसरात असल्यामुळे दलदल असून केव्हाही पडण्याची भीती होती. त्यामुळे घरात पुरलेल्या काशीरामच्या मृतदेहाची अन्यत्र विल्हेवाट लावण्याची योजना मोतीराम व शीलाने आखली होती. त्यानुसार, जून २०१३ मध्ये पावसाळ्यापूर्वी शीला, मोतीराम व संतोषने जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी सांगाडा तेवढा शिल्लक होता. शरीरावरील मास गळाल्याने तुकड्यांमध्ये असलेला सांगाडा पॉलिथीनमध्ये भरून रेल्वे तलावात फेकून देण्यात आला. मात्र ज्या ठिकाणी काशिरामला पुरण्यात आले होते तिथे हाताची दोन हाडे आणि पंजाची हाडे मातीत फसून राहिली होती. बंद घरातून जमिनीत पुरलेली मानवी हाडे आढळून आल्यानंतर तुमसर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवित मृतकाच्या पत्नीसह तीनही जणांना जेरबंद केले. आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास आरोपींनी सांगितलेल्या तलाव परिसरात मृतदेहाचा शोध घेण्यात आला. तलावात पाणी असून मोठ्या प्रमाणात गाळ आहे. तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून हाडे गोळा करण्यात आली. यात छातीच्या बरगड्या, फुटलेली कवटी, हाता-पायाची हाडे व अन्य अवयव आढळले. मिळालेली हाडे नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आली आहेत. तसेच डीएनए चाचणीसाठी मृतकाचा मुलगा सुरज काशिराम कुकडे याच्या रक्ताचे नमुनेही लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणात तुमसर पोलिसांनी मृतकाची पत्नी शीला काशिराम कुकडे, मेहूणा संजय मोतीराम पंचबुद्धे, मुलगा संतोष काशिराम कुकडे यांना अटक करुन भादंवि ३०२ (खून करणे), २०१ (पुरावा नष्ट करणे) कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. तीनही आरोपींना तुमसर न्यायालयाने दि. २९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (तालुका प्रतिनिधी) काशीरामचा मेहुणा संजय पंचबुद्धे, मुलगा संतोष कुकडे यांना अटक करण्यात आली आहे.