शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

‘नीट’मध्ये करण अग्रवाल ‘टॉप’ : यंदा ‘बंपर’ निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 11:13 PM

वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी ‘एनटीए’तर्फे घेण्यात आलेल्या ‘नीट’चा(नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट) निकाल बुधवारी जाहीर झाला. महाविद्यालयांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार निकालांमध्ये यंदा सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी करण अग्रवाल याने उपराजधानीतून अव्वल क्रमांक पटकाविला आहे. त्याला ७२० पैकी ६७० गुण प्राप्त झाले व अखिल भारतीय पातळीवर त्याचा २६२ वा क्रमांक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पात्र विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढलेली दिसून येत आहे.

ठळक मुद्दे‘ऑनलाईन’ निकाल जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी ‘एनटीए’तर्फे घेण्यात आलेल्या ‘नीट’चा(नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट) निकाल बुधवारी जाहीर झाला. महाविद्यालयांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार निकालांमध्ये यंदा सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी करण अग्रवाल याने उपराजधानीतून अव्वल क्रमांक पटकाविला आहे. त्याला ७२० पैकी ६७० गुण प्राप्त झाले व अखिल भारतीय पातळीवर त्याचा २६२ वा क्रमांक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पात्र विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढलेली दिसून येत आहे.५ मे रोजी ‘नीट’चे आयोजन करण्यात आले होते. शहरातील ५० परीक्षा केंद्रांवर २४ हजारांहून अधिक परीक्षार्थी सहभागी झाले होते. करणपाठोपाठ भवन्स बी.पी.विद्यामंदिरची विद्यार्थिनी सायली देबडवार हिने दुसरा क्रमांक पटकाविला. अखिल भारतीय पातळीवर तिचा ७६८ वा क्रमांक आहे. तर सेंट पॉल महाविद्यालयाचाच विद्यार्थी अनिरुद्ध जाधव याने ६५० गुणांसह (अखिल भारतीय क्रमांक-१००७) तृतीय क्रमांक मिळविला. याशिवाय सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाची वैष्णवी रोकडे (६३८ गुण), शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा अभिषेक गणोरकर (६२३ गुण), सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाचा वेदांश सांघी (६२१ गुण), त्याच महाविद्यालयाची चैताली हटवार (६१५ गुण) यांनीदेखील यश संपादित केले. ‘नीट’च्या निकालांमध्ये यंदा सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बाजी मारल्याचे दिसून आले.सरावातूनच मिळाले यश : करण अग्रवालशहरातून प्रथम आलेल्या करण अग्रवाल याने अपेक्षेनुरुप यश मिळाल्याचे सांगितले. मी कधीही अभ्यासाचा फारसा तणाव घेतला नाही. मात्र दररोज ६ ते ७ तास अभ्यास सुरू होता. विशेषत: ‘एनसीईआरटी’च्या पुस्तकांतून अभ्यास केला. सोबतच नियमित सराव सुरूच होता. अखेरच्या दिवसांत पेपर्स सोडविण्यावर लक्ष केंद्रित केले. फिजिक्स माझा आवडता विषय आहे. पुढे जाऊन नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ‘एमबीबीएस’ करायचे आहे. माझ्या यशाचे श्रेय मी माता-पिता व शिक्षकांना देतो, असे करणने सांगितले. करण हा वानखेडे मॅडम्स अ‍ॅकेडमीचा विद्यार्थी होता. त्याचे वडील उमेश अग्रवाल व आई सुनिता अग्रवाल दोघेही डॉक्टर आहेत.६०० हून अधिक गुण मिळविलेले विद्यार्थीविद्यार्थ्याचे नाव         गुण                 महाविद्यालय१ करण अग्रवाल      ६७०       सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालय२ सायली देबडवार  ६५५       भवन्स बी.पी.विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स३ अनिरुद्ध जाधव    ६५०       सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालय४ वैष्णवी रोकडे      ६३८       सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालय५ अभिषेक गणोरकर ६२३    शिवाजी विज्ञान महाविद्यालय६ वेदांश सांघी          ६२१      सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालय७ चैताली हटवार      ६१५      सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालय‘सर्व्हर डाऊन’मुळे निकाल पाहण्यास उशीर‘नीट’चे निकाल संकेतस्थळावर जाहीर झाले. मात्र काही वेळातच संकेतस्थळ संथ झाले. ‘सर्व्हर डाऊन’ झाल्यामुळे विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यात प्रचंड आडचण आली. सायंकाळी ६ वाजतादेखील ‘सर्व्हर डाऊन’च असल्याने विद्यार्थी आणि पालक प्रचंड वैतागले होते.

 

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी