कळंब-यवतमाळ रेल्वे मार्गाची गाडी सुसाट, ३६ पैकी ३० मोठ्या पुलांचे काम पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 13:05 IST2025-07-15T13:04:58+5:302025-07-15T13:05:29+5:30

Yavatmal : बोगदे, इमारतीचे काम वेगात सुरू

Kalamb-Yavatmal railway line is running smoothly, work on 30 out of 36 major bridges completed | कळंब-यवतमाळ रेल्वे मार्गाची गाडी सुसाट, ३६ पैकी ३० मोठ्या पुलांचे काम पूर्ण

Kalamb-Yavatmal railway line is running smoothly, work on 30 out of 36 major bridges completed

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
विदर्भ आणि मराठवाड्याच्या अर्थव्यवस्थेला प्रशस्त करण्याची क्षमता असलेल्या 'वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गावरच्या कलंव-यवतमाळ दरम्यानच्या कामांची गाडी सुसाट निघाली आहे. अनेक मोठे पूल, बोगदे, रेल्वे स्थानके आणि इमारतीची कामे झाली असून, उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत. विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही प्रदेशांतील शेतमाल, व्यापार आणि उद्योगाला भरभराट आणण्याची, पर्यायाने महाराष्ट्राची प्रगती साधण्याची क्षमता या प्रकल्पात आहे.


या मार्गावरील ३६ पैकी ३० मोठ्या पुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून, उर्वरित ३ पुलांचे काम अंतिम टप्प्यात तर ३ पुलांचे काम प्रगतिपथावर आहे. १४ छोट्या पुलांपैकी ३ पूर्ण, २ कामांची प्रक्रिया सुरू असून उर्वरित ९ पुलांचे काम लक्करच सुरू होणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.


डॉ. विजय दर्डा यांचा पाठपुरावा
विशेष उल्लेखनीय असे की, लोकमत एडिटोरियल बोडांचे अध्यक्ष आणि माजी खासदार डॉ. विजय दर्श यांचा हा 'ड्रीम प्रोजेक्ट' आहे. तो वेगाने पूर्ण व्हावा, म्हणून डॉ. दाँ विशेष लक्ष ठेवून आहेत. गेल्या वर्षी वर्धा ते कळंबपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर मात्र हे काम रेंगाळले. ते काम पूर्ण गतीने व्हावे यासाठी डॉ. दर्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवाडे सातत्याने पाठपुरावा चालविला आहे. या पार्श्वभूमीवर, कळंब ते यवतमाळ पर्यंतच्या कामांना आता चांगली गती मिळाली आहे.


तळेगावचे रेल्वेस्थानकाचे काम पूर्ण
कळंब-यवतमाळ दरम्यान एकूण भू-संकलनाचे (अर्थवर्क) ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गावरील तळेगाव रेल्वेस्थानकाचे बांधकाम पूर्ण झाले असून पर्नेटफॉर्मचे काम प्रगतिपथावर आहे. येशील कव्हर ओव्हर प्लॅटफॉर्म (सीजीपी) चीदेखील पायाभरणी झाली आहे.


यवतमाळ स्थानकाचे काम सुरू
यवतमाळ रेल्वेस्थानक भवनाचे बांधकाम सुरू आहे. येथे दोन फ्लॅटफॉर्मचे काम सुरू असून दोन सीओपी, एक फुट ओव्हर ब्रिज (एफओबी) आणि एका आरओबीचे तसेच कर्मचारी वसाहती आणि प्रशासकीय इमारतींचे कामही लवकरच होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.


२९०० मीटर लांब बोगदा
बिनोळा ते कारलीदरम्यान प्रस्तावित २२०० मीटर लांबीच्या बोगद्याचे काम प्रगतिपथावर असून १३०० मीटर ड्रिलिंग पूर्ण झाले आहे.
१० रोड ओव्हर ब्रिज (आरजीबी) पैकी बहुसंख्य आरओचीचे काम पूर्ण झाले आहे. एका आरओबीसाठी वन विभागाच्या परवानगीची प्रतीक्षा आहे.

Web Title: Kalamb-Yavatmal railway line is running smoothly, work on 30 out of 36 major bridges completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.