शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
3
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
4
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
5
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
6
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
7
७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
8
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
9
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
10
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
11
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 
12
ind vs oman: ओमानविरुद्धच्या सामन्याआधी भारतीय खेळाडूंनी मैदानात गाळला घाम, पाहा फोटो!
13
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
14
"नक्कीच जुळं होणार", प्रिया बापटचा बेबी बंपचा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या कमेंट्स
15
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
16
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
17
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
18
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
19
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
20
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 

जरा हटके! जेव्हा भंगाराला कलात्मक रूप मिळते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 14:23 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभागाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी भंगारातून (स्क्रॅप) अप्रतिम कलाकृती साकार करून नवे सृजन घडविले आहे.

ठळक मुद्देललित कला विभागाची सृजनशीलता राज्यात विद्यापीठांमधील पहिलाच अभिनव प्रयोग साकारल्या अप्रतिम कलाकृती

निशांत वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘जहां ना पहुंचे रवि, वहां पहुंचे कवि’,असे म्हणतात ते काही चूक नाही. कलावंतांमधील सृजनात्मकता अनाकलनीय असते. सामान्य माणसांना जो कचरा वाटतो, कलावंतांची दृष्टी त्यात नवीन सृजन करते. तुमच्या-आमच्या घरी जुन्या अडगळीत पडलेले साहित्य असतेच, ते साहित्य एक तर फेकणे किंवा विकणे, हे दोनच पर्याय आपल्याजवळ असतात किंवा सुचतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातही असेच भंगार पडलेले होते व वरील दोनच पर्याय त्यांच्याजवळ होते. पण विद्यापीठाच्या ललित कला विभागाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी या भंगारातून (स्क्रॅप) अप्रतिम अशी कलाकृती साकार करून नवे सृजन घडविले आहे.भंगार किंवा निघणारा कचरा ही घरोघरची समस्या आहे. तुटलेल्या खुर्च्या, तुटलेले दरवाजे, जुने कूलर, पंखे, निरुपयोगी भांडे, खेळणी असे नानाविध भंगार अडगळीत पडलेले असते. कधी तरी दिवाळी किंवा एखाद्या समारंभासाठी स्वच्छता आरंभली की हे भंगार घराबाहेर विक्रीसाठी बाहेर पडते. नागपूर विद्यापीठाच्या विविध विभागामध्येही अशाचप्रकारे भंगार पडलेले आहे. जुन्या आलमारी, कूलर, पंखे, खुर्च्या, रॅक आणि ‘ई-वेस्ट’(संगणकाचे साहित्य)सुद्धा. विभागांची जागा व्यापून असलेला हा कचरा फेकायचा किंवा विकायचा, असा विचार विद्यापीठात सुरू होता. तेव्हा ललित कला विभागप्रमुख डॉ. मुक्तादेवी मोहिते यांनी हा कचरा आम्हाला द्या, अशी मागणी केली. प्रस्ताव ऐकून सर्वांना आश्चर्यही वाटले. पण मागणीनुसार विविध विभागाचे हे भंगार एक दिवस अमरावती रोड-अंबाझरी या मार्गावरील ललित कला विभागाच्या जागेवर पडले. लोकांना गंज चढून खराब दिसणारा, नकोसा वाटणाऱ्या या कचºयातून विभागातील कलात्मक मेंदूद्वारे नवे सृजन सुरू झाले.विभागातील प्राध्यापक, चित्रकार व कलेचे विविध विषय शिकणारे विद्यार्थी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन भंगारावर तुटून पडले. त्यांच्या कल्पनेतील कलाकृतीसाठी आवश्यक त्या साहित्याची जुळवाजुळव सुरू झाली. त्यानंतर प्राध्यापक व काही विद्यार्थी असे समूह तयार करून साहित्याची जोडणी व मांडणी सुरू झाली. ही कलात्मकता विभागाच्या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त होती; पण या कलावंत मेंदूंनी सर्वांना नकोसे वाटणाºया या भंगारातून वेगळीच नवनिर्मिती केली. कल्पनेतील आकार जसा मिळाला, तसे प्रत्येकाचे डोळे आश्चर्याने भरले.भंगार देणाºया विभागातील कर्मचाऱ्यांनाही, आपण दिलेला कचरा असे कलात्मक रूप घेऊ शकतो, याचेच आश्चर्य होते. गतिशील घोडा, चांद्रयान मोहीम, फुलपाखरू, लायब्ररी, विविध प्राणी, पशुपक्ष्यांचे रूप, रोबोट, झाडे, पदवी घेतलेला विद्यार्थी असे नानाविध लक्षवेधी रूप या भंगारातून निर्माण झाले. ही अप्रतिम रचना बघायला शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी व शिक्षक, उद्योग संस्थांचे प्रतिनिधी व विद्यापीठातील मान्यवरांनीही भेटी दिल्या. राज्यातील विद्यापीठांद्वारे घडलेला हा पहिलाच प्रयोग सर्वांना सुखावून गेला.

कार्यशाळेत विभागातील कलात्मक मेंदूललित कला विभागप्रमुख डॉ. मुक्तादेवी मोहिते यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमात डॉ.सदानंद चौधरी, डॉ.हरीश वाळके, डॉ.स्नेहल लिमये, डॉ.अमोल गुल्हाणे, प्रा.मौक्तिक काटे, प्रा.मनोज चोपडे, प्रा.महेश मानकर, प्रा.दीपक सोरते, प्रा.रुचिता अट्याळकर, हे सहभागी होते. डॉ.रवि हरिदास, प्रा.सुमित भोयर, डॉ.संयुक्ता थोरात यांनी सहकार्य केले तर मिलिंद लिंबेकर व अभिषेक चौरसिया यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे उद््घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, प्र-कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ.दीपक खिरवडकर, कुलसचिव डॉ.नीरज खटी, डॉ.ढोबळे, डॉ.स्नेहा देशपांडे यांनी केले. कार्यशाळेचा समारोपीय कार्यक्रम डॉ. एस बी झाडे, डॉ. राजू मानकर, डॉ.विनोद इंदूरकर यांच्या उपस्थितीत पार पडला. सहभागी विद्यार्थ्यांमध्ये जेरॉल्ड फ्रान्सिस, पल्लवी पन्नासे, नेहा पाटील, उत्कर्षा चिमोटे, नंदीनी दिघाडे, समर कोठीवान, संकल्प गायकवाड, शाकंबरी तिवारी, महिमा सिंग, फाल्गुनी मारबते, अश्वीनी भोयर, चारूता खारोकर, सोनाली बोरकर, धिरेंन्द्र बैस, राजेश्री काटे, पल्लवी रानडे, रोशनी प्रजापती परीतोष डवरे, अजय अवचट, प्रणाली वानवे, राणी वैरागडे, विनोद कावे, शुभम उमरेडकर, रोशनी पालीमकर, चेतन खिरेकर, स्मुती सब्बनवार, कवन कावडे यांचा समावेश होता.नॅक कमिटीच्या भेटीनंतर विद्यापीठाने विविध विभागांना सृजनात्मक काही करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आम्ही भंगारातून कलाकृती साकारण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानुसार विभागाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी भंगारातून ही अप्रतिम कलाकृती साकारली आहे. ही कलाकृती आणखी १५ दिवस प्रदर्शनासाठी खुली राहणार आहे. भेटीसाठी आलेल्या शाळा-महाविद्यालय, उद्योग समूहांच्या प्रतिनिधींनीही अशी कलाकृती त्यांच्याकडे साकारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ही बाब खरोखर सुखावणारी आहे.- डॉ. मुक्तादेवी मोहिते,विभाग प्रमुख, ललित कला विभाग

टॅग्स :Jara hatkeजरा हटके