कारागृह अधीक्षक कुमरे यांच्या चौकशीवर सोमवारी निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:13 IST2021-02-06T04:13:56+5:302021-02-06T04:13:56+5:30
न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांनी शुक्रवारी या प्रकरणातील आणखी विविध पैलू तपासून घेतले. त्यानंतर कुमरे यांच्या ...

कारागृह अधीक्षक कुमरे यांच्या चौकशीवर सोमवारी निर्णय
न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांनी शुक्रवारी या प्रकरणातील आणखी विविध पैलू तपासून घेतले. त्यानंतर कुमरे यांच्या चौकशीवर सोमवारी निर्णय देऊ, असे सांगितले. दरम्यान, अनुपकुमार कुमरे यांनी आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन केले नाही, असे नमूद करून न्यायालयाची माफी मागितली. परंतु, न्यायालयाने त्यांना माफ करण्यास नकार दिला. याशिवाय न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या आदेशानुसार, सीबीआयने प्रतिज्ञापत्र सादर करून स्वत:ची बाजू स्पष्ट केली. संबंधित आरोपी रविशंकर लोंधेकर यांना तत्काळ जामिनावर सोडण्याचा आदेश कारागृह प्रशासनाला दाखवला होता; परंतु, त्यांनी सायंकाळी ५ वाजतानंतर आरोपीला सोडता येत नसल्याचे सांगून आदेशाचे पालन केले नाही ही बाब सीबीआयने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर न्यायालयाने कुमरे यांची ही कृती अवमानजनक असल्याचे मत व्यक्त केले.