लक्ष्मीपूजनाच्या पूजेतील दागिने लंपास; दिवाळी पडली महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2022 22:40 IST2022-10-25T22:39:13+5:302022-10-25T22:40:33+5:30
Nagpur News लक्ष्मीपूजनाच्या पूजेतील दागिने चोरीला गेल्याची घटना जरीपटका येथे घडली.

लक्ष्मीपूजनाच्या पूजेतील दागिने लंपास; दिवाळी पडली महागात
नागपूर : लक्ष्मीपूजनाच्या पूजेतील दागिने चोरीला गेल्याची घटना जरीपटका येथे घडली. जरीपटका येथील दयानंद शाळेजवळ ही घटना घडली.
भावना महेश वासवानी यांनी दिवाळीच्या रात्री लक्ष्मीच्या मूर्तीला दागिने घातले. रात्री अडीच वाजता भावना कुटुंबासह झोपल्या. यानंतर अज्ञात आरोपींनी खिडकीतून हात टाकून सव्वा दोन लाख रुपये किमतीचे दागिने पळवून नेले. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. जरीपटका पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.