राेख रकमेसह दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:08 IST2021-07-20T04:08:12+5:302021-07-20T04:08:12+5:30

काेंढाळी : अज्ञात चाेरट्याने घरफाेडी करीत राेख रकमेसह साेन्याचे दागिने असा एकूण ६३ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून ...

Jewelry lamps with a rake amount | राेख रकमेसह दागिने लंपास

राेख रकमेसह दागिने लंपास

काेंढाळी : अज्ञात चाेरट्याने घरफाेडी करीत राेख रकमेसह साेन्याचे दागिने असा एकूण ६३ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना काेंढाळी येथील ठवळेपुरा येथे रविवारी (दि. १८) उघडकीस आली.

विकास त्र्यंबक भाेयटे (वय ६०, रा. ठवळेपुरा, काेंढाळी) हे कुटुंबीय १२ जुलैला बाहेरगावी गेले हाेते. दरम्यान, अज्ञात चाेरट्याने त्यांच्या घराच्या दाराची कडी ताेडून आत प्रवेश केला. यात चाेरट्याने घरातील कपाटात ठेवलेले राेख ५३,९०० रुपये, तसेच १० हजारांचे साेन्याचे दागिने असा एकूण ६३ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. रविवारी भाेयटे यांना घरात चाेरी झाल्याचे आढळून येताच, त्यांनी पाेलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, तपास सुरू केला आहे.

Web Title: Jewelry lamps with a rake amount