बेळगाव कारागृहातून जयेशने केले होते पाकिस्तानात फोन; विशेष सॉफ्टवेअरचा करायचा उपयोग
By योगेश पांडे | Updated: May 27, 2023 18:00 IST2023-05-27T18:00:03+5:302023-05-27T18:00:27+5:30
Nagpur News केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा जयेश पुजारी उर्फ शाकीर याच्या चौकशीतून आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. जयेशने कारागृहातून पाकिस्तानसह विविध देशांमध्ये फोन लावले होते.

बेळगाव कारागृहातून जयेशने केले होते पाकिस्तानात फोन; विशेष सॉफ्टवेअरचा करायचा उपयोग
योगेश पांडे
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा जयेश पुजारी उर्फ शाकीर याच्या चौकशीतून आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. जयेशने बेळगाव कारागृहातून पाकिस्तानसह विविध देशांमध्ये फोन लावले होते. फोन कॉल ट्रेस होऊ नये यासाठी तो विशिष्ट सॉफ्टवेअरचा उपयोग करायचा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नाराजीतून त्याने गडकरींना धमकीचा फोन लावला होता.
कर्नाटकातील तुरुंगात जयेशचा पीएफआयच्या राष्ट्रीय कार्यकारी।परिषदेचा सचिव मोहम्मद अफसर पाशा याने ब्रेनवॉश केला होता. पाशा तुरुंगात असताना त्याच्याकडे मोबाईल असायचा आणि त्या मोबाईलमध्ये त्याच्याकडे विशेष सॉफ्टवेअर होते. तेच सॉफ्टवेअर जयेशने काही काळ वापरले होते. त्याने भारतातील विविध ठिकाणी फोन केले होते. शिवाय पाकिस्तान, अमेरिका, सुदान, नायजेरिया आणि पोलंडमध्येही संपर्क साधल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे. त्याने नेमका कुणाला संपर्क केला होता हे एनआयएच्या चौकशीतून समोर येण्याची शक्यता आहे.
म्हणून दिली गडकरींना धमकी
पीएफआय वर बंदी येऊ शकते, तर संघावर बंदी का नको हा विचार जयेशच्या मनात घोळत होता. गडकरी संघाच्या जवळचे असल्याने त्याने त्यांच्या कार्यालयात फोन करून धमकी दिली, अशी माहिती सूत्रांनी दिली.