शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
2
Kolhapur Mahadevi Elephant : अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
3
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
4
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
5
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
6
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
7
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
8
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
9
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
10
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
11
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
12
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
13
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
14
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
15
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
16
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
17
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
18
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
19
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
20
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी

"जवाहरलाल नेहरूंनीदेखील मागितली होती इंग्रजांची माफी", केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा दावा

By योगेश पांडे | Updated: April 2, 2023 21:57 IST

Anurag Thakur : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावकर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले असताना केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनीदेखील इंग्रजांची माफी मागितली होती असा दावा रविवारी येथे केला.

- योगेश पांडे नागपूर : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावकर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले असताना केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनीदेखील इंग्रजांची माफी मागितली होती असा दावा रविवारी येथे केला. नागपुरात आयोजित ‘लोकमत नॅशनल मीडिया कॉन्क्लेव्ह’मध्ये ते बोलत होते. या ‘कॉन्क्लेव्ह’चे उद्घाटन राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या ‘एडिटोरिअल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार डॉ.विजय दर्डा अध्यक्षस्थानी होते.

जालियनवाला नरसंहारानंतर उफाळलेला असंतोष आणि अकालींचे आंदोलन यादरम्यान पंजाबमधील नाभा संस्थानात बेकायदेशीर प्रवेश केल्याबद्दल पंडित जवाहरलाल नेहरूंना दोन वर्षांची शिक्षा झाली होती. परंतु मातीच्या भिंती असलेल्या तुरुंगात राहणे नेहरू यांना सहन झाले नाही व पुन्हा संस्थानात प्रवेश करणार नाही या आशयाचा लेखी माफीनामा त्यांनी दिला. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांनी व्हाइसरॉयकडे रदबदली केली. त्यामुळे दोन आठवड्यात शिक्षा माफ झाली, असा घटनाक्रम ठाकूर यांनी सांगितला.

यावेळी अनुराग सिंह ठाकूर यांनी राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी तसेच बिहार सरकारवर सडकून टीका केली. राहुल गांधी यांच्या ‘माफी मागायला मी सावरकर नाही’ हे वक्तव्य म्हणजे ते कधीच सावरकर होऊ शकत नाहीत, ही कबुली आहे. कारण तशी तपस्या व त्याग असावा लागतो. कुणाचा सन्मान करू शकत नसाल तर कमीत कमी अपमान करायला नको, असे ठाकूर म्हणाले. स्वत: राहुल गांधी यांनी २०१८ साली सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली. आता ते म्हणतात की ‘गांधी कधीच माफी मागत नाहीत’. यातून त्यांचा अहंकार दिसून येताे. त्यांची खासदारकी रद्द करण्यात केंद्राची काहीच भूमिका नाही, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले.

'लोकमत नॅशनल मीडिया कॉन्क्लेव्ह'मध्ये ‘एएनआय’च्या संपादक स्मिता प्रकाश, न्यूज १८ (हिंदी)चे व्यवस्थापकीय संपादक अमिश देवगण, एबीपीचे राष्ट्रीय संपादक विकास भदौरिया, न्यूज १८-लोकमतचे संपादक आशुतोष पाटील, पंजाब केसरी व नवोदया टाईम्सचे कार्यकारी संपादक अकु श्रीवास्तव, राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे, ज्येष्ठ पत्रकार एस.एन.विनोद, हिंदुस्तान टाईम्सचे सहयोगी संपादक प्रदीपकुमार मैत्र, एबीपी माझाच्या उपकार्यकारी संपादक सरिता कौशिक, ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बावीस्कर प्रत्यक्ष तर टाईम्स नेटवर्कच्या समूह संपादक नविका कुमार आभासी पद्धतीने सहभागी झाल्या. लोकमत डिजिटलचे संपादक आशीष जाधव व लोकमत समाचारचे सहयोगी संपादक संजय शर्मा यांनी या सर्वांना बोलते केले.

बिहारमध्ये ‘जंगलराज रिटर्न्स’, पुरस्कारवापसी गॅंग कुठे आहे ?बिहार व पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावरून अनुराग सिंह ठाकूर यांनी टीकास्त्र सोडले. बिहारमध्ये काही विशिष्ट लोक सत्तेवर आले की तेथे हिंसा वाढते. आताची स्थिती पाहून तेथे ‘जंगलराज रिटर्न्स’ असेच म्हणावे लागले. तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी तुष्टीकरणाचे राजकारण करत असून तेथील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. हाच प्रकार भाजपशासित राज्यात झाला असता तर काही बुद्धिजीवींनी आक्रोश केला असता. मात्र आता ती पुरस्कारवापसी गॅंग कुठे गेली आहे, असा सवाल अनुराग ठाकूर यांनी उपस्थित केला. दिल्लीत केजरीवाल यांचे तीन मंत्री तुरुंगात असूनदेखील ते जगाला ज्ञान वाटत आहेत, अशी टीकादेखील त्यांनी केली.

माध्यमांची भूमिका राष्ट्रहिताची हवीपंतप्रधान मोदी हे काही पत्रकारांच्या मनात आहेत तर काहींच्या डोक्यात आहेत. मात्र विकसनशील देशातून विकसीत देशाकडे जाण्याची वाटचालीत माध्यमांची भूमिका ही सकारात्मक व राष्ट्राच्या हिताची असायला हवी, असे मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. माध्यमांबाबत सोशल माध्यमांवर नकारात्मक प्रचार-प्रसार होतो. मात्र माध्यमांचे कुठल्याही प्रकारचे ध्रुवीकरण झालेले नाही. माध्यमे कालसुसंगत पद्धतीनेच कार्य करत आहेत, असे प्रतिपादन स्मिता प्रकाश यांनी केले.

टॅग्स :Anurag Thakurअनुराग ठाकुरBJPभाजपाJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू