जरीपटका आणि पारडीत बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:09 IST2021-05-19T04:09:40+5:302021-05-19T04:09:40+5:30

जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या पाच वर्षांच्या चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या १५ वर्षांच्या मुलाने बलात्कार केला. १५ मेच्या सकाळी ही ...

Jaripatka and rape in Pardi | जरीपटका आणि पारडीत बलात्कार

जरीपटका आणि पारडीत बलात्कार

जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या पाच वर्षांच्या चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या १५ वर्षांच्या मुलाने बलात्कार केला. १५ मेच्या सकाळी ही घटना घडली.

जरीपटका पोलिसांनी मंगळवारी या प्रकरणात गुन्हा दाखल केला. त्याचप्रमाणे पारडी परिसरात राहणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर आरोपी मयुर मुनेश्वर नागदेवे याने बलात्कार केला. १२ मे रोजी दुपारी १२ च्या सुमारास ही मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपी नागदेवे तिच्या घरात शिरला आणि तिला आई वडील तसेच भावाला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. मुलीने ही घटना सोमवारी पालकांना सांगितली. त्यानंतर पालकांनी तिला पारडी पोलीस ठाण्यात नेले. तेथे तिची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

Web Title: Jaripatka and rape in Pardi