शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Jara hatke : २० वर्षीय युवकाला ५२ दात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 20:00 IST

निसर्गाने मानवाची रचना करताना, त्याला ३२ दातांचे वरदान दिले आहे. जन्मानंतर वयाच्या १८ वर्षापर्यंत ३२ दातांची निर्मिती टप्प्याटप्प्याने होत असते. पण कोहिनूर नाडे या २० वर्षीय युवकाला निसर्गाने ५२ दातांचे वरदान दिले.

ठळक मुद्देडॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून काढले २० दात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निसर्गाने मानवाची रचना करताना, त्याला ३२ दातांचे वरदान दिले आहे. जन्मानंतर वयाच्या १८ वर्षापर्यंत ३२ दातांची निर्मिती टप्प्याटप्प्याने होत असते. पण कोहिनूर नाडे या २० वर्षीय युवकाला निसर्गाने ५२ दातांचे वरदान दिले. मात्र कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यावर त्याचा परिणाम वाईट होतोच. तसचे कोहिनूरला असलेले अतिरिक्त २० दात त्याच्यासाठी अडचणीचेच ठरत होते. नुकताच त्याच्या दातांवर प्रसिद्ध सर्जन डॉ. धनंजय बरडे यांनी शस्त्रक्रिया केली. कोहिनुरचे अतिरिक्त २० दात काढून त्याचा त्रास कमी केला.

कोहिनूरच्या हनुवटीमध्ये २० दात होते. ते बाहेरून दिसत नसले तरी हिरड्यांमध्ये लपलेले होते. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर नेहमी सूज रहायची. त्याचा त्रास त्याला व्हायचा. डॉ. बरडे यांच्याकडे ऑक्टोबर महिन्यात कोहिनूर नाडे तपासणीसाठी आला होता. त्यांनी त्याच्या दातांचा एक्सरे काढला. त्यात २० दात हनुवटीच्या बाजूला हिरड्यांमध्ये लपलेले होते. डॉक्टरांच्या मते याला एक प्रकारचा ट्युमर किंवा गाठी म्हणतात. भविष्यात रुग्णासाठी ते हानीकारक ठरू शकले असते. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला ऑपरेशनचा सल्ला दिला. दोन आठवड्यापूर्वी त्याच्यावर अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया झाली. ही शस्त्रक्रिया करताना त्याच्या चेहऱ्यावर कुठलेही व्रण येणार नाही, याची काळजी डॉक्टरांनी घेतली. १ तास जवळपास या शस्त्रक्रियेला लागले. या शस्त्रक्रियेतून डॉक्टरांनी त्याच्या हिरड्यांमध्ये लपलेले २० दात बाहेर काढले. शस्त्रक्रियेदरम्यान इतर दातांना त्रास होणार नाही, याची काळजी डॉक्टरांनी घेतली. आता रुग्ण अतिशय स्वस्थ असून, दातामुळे होणारा त्रास त्याचा कमी झाला आहे.कोहिनूरच्या हिरड्यांमध्ये २० दात लपले होते. त्यांना वाढीला जागाच नव्हती. माझ्या १७ वर्षाच्या प्रॅक्टीसमध्ये दुसऱ्यांदा हा प्रकार आढळला आहे. इतके अतिरिक्त दात असणे हे क्वचितच होते. भविष्यात हे रुग्णांसाठी हानीकारक ठरले असते. रुग्णावर शस्त्रक्रिया केल्याने त्याचा भविष्यातील धोका टळला आहे.डॉ. धनंजय बरडे, ओरल अ‍ॅण्ड मॅक्सीलोफिशल सर्जन

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेnagpurनागपूर