जनता कर्फ्यु: सहृदयी नागरिकांनी घेतली कर्तव्यदक्ष पोलिसांची काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 14:12 IST2020-03-22T14:12:02+5:302020-03-22T14:12:47+5:30
पहाटेपासूनच शहरातल्या चौकाचौकात व रस्त्यांवर उभे राहून शांततेसह चोख बंदोबस्त राखणाऱ्या पोलिस जवानांना चहा नाश्ता देऊन सहृदयी नागरिकांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली.

जनता कर्फ्यु: सहृदयी नागरिकांनी घेतली कर्तव्यदक्ष पोलिसांची काळजी
ठळक मुद्देचहा व नाश्ता नेऊन दिला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: पहाटेपासूनच शहरातल्या चौकाचौकात व रस्त्यांवर उभे राहून शांततेसह चोख बंदोबस्त राखणाऱ्या पोलिस जवानांना चहा नाश्ता देऊन सहृदयी नागरिकांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली.
जनता कर्फ्यु यशस्वी करण्यासाठी अहोरात्र सेवा देत असलेल्या पोलिस जवानांना नागपुरातील काही ठिकाणच्या नागरिकांनी चहा व नाश्ता नेऊन दिला. एका सामाजिक संस्थेने नाश्त्याचे डबे बनवून त्याचे वितरण केले. इतवारी, सावरकरनगर चौक या भागात नागरिकांनी पोलिसांची मदत केली. महिला पोलिसांनाही घरी पाचारण करून त्यांना स्वच्छतागृह वापरण्यास दिले.