शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

'जैश ए मोहम्मद'कडून नागपूरसह दिल्लीतही रेकी, चार हस्तकांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 21:21 IST

चार हस्तकांना अटक : रईसच्या नागपूर संपर्कातील अनेकांची चौकशी : 'बंदा' ही टप्प्यात ? नरेश डोंगरे

नागपूर : जैश ए मोहम्मद ने नागपूर सोबतच दिल्लीतही रेकी करून घेतल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. जैश चे हस्तक आणि रईसचे चार साथीदार पुन्हा काश्मीर मध्ये पकडले गेले. त्यांच्याकडून ही माहिती उघड झाल्याचे शिर्षस्थ सूत्रांनी लोकमतला सांगितले आहे. दरम्यान, येथील संघ मुख्यालयासह विविध संवेदनशील स्थळांच्या रेकी प्रकरणात जैश ए मोहम्मदच्या हस्तकाला जो बंदा मदत करणार होता, तो तपास यंत्रणेच्या टप्प्यात असून त्याच्या मुसक्या कोणत्याही क्षणी आवळल्या जाऊ शकतात, अशीही माहिती शिर्षस्थ सूत्रांकडून मिळाली आहे. 

आत्मघाती हल्ल्याच्या इराद्याने जैश ए मोहम्मदचा ऑपरेशन कमांडर उमर याने पाकिस्तानात बसून त्याच्या हस्तकाला नागपुरात पाठविले होते. रईस अहमद असाद उल्ला शेख (२६, अवंतीपुरा, काश्मीर) नामक या हस्तकाकडून उमरने संघ मुख्यालयासह विविध संवेदनशील स्थळाची रेकी करून घेतली. तत्पूर्वी 'नागपुरात पोहोचल्या बरोबर तुला एक 'बंदा' भेटेल आणि तो सगळ्या प्रकारची मदत करेल', असे उमरने रईसला सांगितले होते. 'हा बंदा कोण आहे, नागपूरचा की नागपूरच्या बाहेरचा', ते अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, तपास यंत्रणा त्याचा कसून शोध घेत आहेत. त्यातून 'बंदा' अधोरेखित झाल्याची खास सूत्रांची माहिती आहे. हा बंदा टेक्नोसॅव्ही अन कमालीचा अलर्ट असून त्याच्याकडे अनेक सीम असावे, असाही अंदाज आहे. तो कितीही धूर्त असला तरी त्याचा लवकरच छडा लावला जाईल, असा सूत्रांचा दावा आहे. दरम्यान, जैश ने एकीकडे नागपुरात तर दुसरीकडे दिल्लीतही अनेक संवेदनशील स्थळांची रेकी केली आहे. रईसच्या चौकशीनंतर जैशचे पुन्हा चार हस्तक काश्मीरमध्ये पकडण्यात आले. त्यांच्याकडून हा खळबळजनक खुलासा झाल्याचे खास सूत्रांनी लोकमतला सांगितले आहे. परिणामी तपास यंत्रणा आता आणखीच जास्त सक्रिय झाल्या आहेत.

पन्नासेक जणांची चौकशी स्थानिक अधिकाऱ्यांनी श्रीनगरला जाऊन रईसची चौकशी केल्यानंतर स्थानिक पोलिस तसेच एटीएसने आजवर 'रईस' च्या संपर्कात आलेल्या पन्नासेक जणांची चौकशी केली आहे. ज्या हॉटेल मध्ये तो थांबला होता, त्या हॉटेलच्या चालक, मालक, वेटर, कर्मचारी, ज्या मशिदीत गेला होता, जिथून त्याने ताविज घेतला, त्यांनाही विचारपूस करण्यात आली आहे. रईसने ज्या ज्या वाहनांचा नागपुरात वापर केला, ती सर्व वाहने शोधून पोलिसांनी वाहनचालकांनाही प्रदीर्घ विचारपूस केली आहे. या सर्व चौकशीतून येथे रईसला कुणीही मदत केली नसल्याचा निष्कर्ष पोलिसांनी आतापर्यंतच्या चौकशीतून काढला, असे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज पत्रकारांना सांगितले. 

चौकशी प्रदीर्घ चालणार नागपूर सोबतच दिल्लीतही रेकी करण्यात आल्याचे आता स्पष्ट झाल्याने हे प्रकरण अत्यंत गँभीर बनले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी आणखी अनेक दिवस सुरू राहणार आहे. स्थानिक पोलिस, दिल्ली पोलीस एटीएस, एनआयए तसेच गुप्तचर संस्था एकमेकांशी समन्वय ठेवून रेकी प्रकरणाचा तपास करीत आहेत 

टॅग्स :Jaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदnagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस