शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

कारागृह उपमहानिरीक्षक साठे यांनी पदभार सोडला

By admin | Updated: July 24, 2015 02:34 IST

कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी नागपूर विभाग कारागृह प्रशासनाचा पदभार सोडल्याने संबंधित विभागात खळबळ उडाली आहे.

देसाई यांच्यावर धुरा?: पदभार सोडल्याने खळबळ नागपूर : कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी नागपूर विभाग कारागृह प्रशासनाचा पदभार सोडल्याने संबंधित विभागात खळबळ उडाली आहे. याकूब मेमनच्या फाशीच्या अनुषंगाने तुरुंग प्रशासन प्रचंड दडपणात असताना झालेल्या या घडामोडीमुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. ३१ मार्च २०१५ च्या पहाटे नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पाच खतरनाक कैदी पळून गेल्यामुळे राज्याचे तुरुंग प्रशासन हादरले होते. या कारागृहात चालणाऱ्या गैरप्रकाराचे वाभाडे निघाल्यामुळे राज्य सरकारने येथील ५ तुरुंग अधिकाऱ्यांसह ११ जणांना निलंबित केले होते. एकाला बडतर्फही करण्यात आले. त्यानंतर महिनाभराने कारागृहाचे उपमहानिरीक्षक शशिकांत शिंदे यांची येथून बदली झाली. त्यांचा प्रभार स्वाती साठे यांच्याकडे सोपविण्यात आला. अधूनमधून त्या नागपूर कारागृहात येऊन येथील कामकाजाचा आढावा घेऊ लागल्या. दरम्यान, १९९३ ला मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेचा सूत्रधार याकूब मेमन याचा डेथ वॉरंट निघाल्याचे वृत्त प्रकाशित झाले. त्याला नागपूर कारागृहात ३० जुलैला फाशी देणार असल्याचीही जोरदार चर्चा सुरू झाली. यामुळे नागपूर कारागृहाच्या आत-बाहेर कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला असून, कारागृह अधिकारी प्रचंड दडपणात असल्याचे एकूणच हालचालीवरून जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर, बुधवारी सकाळी उपमहानिरीक्षक स्वाती साठे नागपूर मध्यवर्ती कारागृहात आल्या. त्यांनी कारागृहाच्या आतमध्ये भेट देऊन अंतर्गत स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर ध्यानीमनी नसताना सायंकाळी त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार कारागृह अधीक्षक योगेश देसाई यांच्याकडे सोपवला. या अनपेक्षित घडामोडीमुळे खळबळ उडाली आहे.कावळा बसावा आणि फांदी तुटावी - स्वाती साठेयासंबंधाने साठे यांच्याशी लोकमत प्रतिनिधीने संपर्क साधला असता, ‘जेल बे्रक’ नंतर निर्माण झालेल्या स्थितीमुळे आपण प्रभार स्वीकारला होता. आता स्थिती पूर्वपदावर आली आहे. त्यामुळे मी पुण्यात राहून नागपूरचा कारभार बघणे, संयुक्तिक नाही. याउलट तेथील व्यक्ती अधिक चांगल्याप्रकारे ती जबाबदारी सांभाळू शकते. त्यामुळे आपल्याला या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी मागणी आपण खूप दिवसांपूर्वीच नोंदवली होती. ती वरिष्ठांकडून मान्य झाली.त्याचमुळे बुधवारी मी योगेश देसाई यांच्याकडे हा पदभार सोपवला, असे त्या म्हणाल्या. याकूबच्या फाशीची जोरदार चर्चा देशभर सुरू असताना ही घडामोड घडली, यामागे काही खास कारण आहे काय, अशी विचारणा केली असता त्या म्हणाल्या, वेगळे असे काहीच नाही. याकूबच्या फाशीचा विषय आणि आपण पदभार सोडणे या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ‘कावळा बसावा आणि फांदी तुटावी’, तसाच हा प्रकार म्हणता येईल.