शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
4
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
5
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
6
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
7
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
8
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
9
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
10
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
11
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
12
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
13
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
14
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
15
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
16
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
18
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
19
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
20
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!

आली दिवाळी ... खरेदीसाठी नागपुरातील बाजारात ग्राहकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 23:58 IST

दिवाळीत सर्व बाजारपेठांमध्ये ग्राहकांची खरेदीसाठी प्रचंड गर्दी आहे.महाल, इतवारी, गांधीबाग, सीताबर्डी या बाजारात पाय ठेवायलाही जागा नाही.

ठळक मुद्देकोट्यवधींची उलाढाल : फटाके, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळीत सर्व बाजारपेठांमध्ये ग्राहकांची खरेदीसाठी प्रचंड गर्दी आहे. महाल, इतवारी, गांधीबाग, सीताबर्डी या बाजारात पाय ठेवायलाही जागा नाही. आर्थिक मंदी असल्याचे म्हटले जाते. पण तोरणे, कंदील, पणत्या, शोभिवंत वस्तू, रांगोळी, फराळ, सुका मेवा, कपडे यांची रेलचेल आणि हे खरेदी करण्यासाठी बाजारांमध्ये तितकीच गर्दी उसळलेली दिसत आहे.

‘माझ्या घरी ही दिवाळी, असे म्हणत दरवर्षी नव्या दमाने, नव्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा केला जातो. नागपूरच्या दिवाळीची मजा काही वेगळीच आहे. हातावर पोट भरणाऱ्या गरीबाच्या झोपडीपासून लखपती करोडपतींच्या आलिशान बंगल्यातही तोच झगमगाट दिसतो. 
मॉल, गल्लीबोळातील दुकानांमध्ये दिवाळीसाठीच्या नवनवीन वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. यावर्षी विधानसभा निवडणुकांमुळे या बाजारामध्ये चार दिवसांपर्यंत तुरळक गर्दी होती. मतदान होताच नागपूरकरांनी खरेदीसाठी बाजारांमध्ये गर्दी केल्याचे दिसत आहे. बहुतांश सर्वच वस्तू एकाच ठिकाणी मिळत असल्याने महाल, इतवारी आणि सीताबर्डी मार्केटमध्ये जाऊन खरेदी करण्याकडे अधिक ओढा दिसतो. सुका मेवा, चॉकलेट्स, खेळणी, कॉस्मेटिक्स, वेगवेगळ्या वस्तू, गिफ्ट रॅपर्स, निरनिराळ्या आकाराच्या पिशव्या, भेटवस्तू, परफ्युम्स आदी सर्व अत्यावश्यक गोष्टींची दुकाने येथे आहेत. लखनवी कपडे, खादीचे कपडे, ब्रॅण्डेड कपडे, लहान मुलांचे तयार कपडे, विविध ब्रॅण्डच्या कॉस्मेटिक्स वस्तू, पडदे, सोफ्याची कापड, दिव्याची तोरणे, कंदील, पणत्या व अन्य बरेच खरेदीसाठी उपलब्ध आहे. प्लास्टिक बंदी असली तरी विक्रेत्यांनी उरलेल्या प्लास्टिकच्या कंदिलांचा स्टॉक बाहेर काढला आहे. लोकांचा कल मात्र कागदी, कापडी आणि लाकूड तसेच बांबूपासून बनविलेल्या कंदिलाच्या खरेदीकडे आहे.

प्लास्टिकच्या तुलनेत हे कंदील महाग आहेत मात्र तरीही हेच कंदील लोकांच्या पसंतीला उतरत आहेत.इलेक्ट्रिक सामानाची बाजारपेठ रंगीबेरंगी तोरणांनी सजली आहे. तोरणासोबत, लाईट, क्रिस्टल दिवे, लटकते दिवे अशा अनेक प्रकारच्या दिव्यांचा लखलखाट पसरला आहे. कर्टन्स लाईट, थ्रेड लाईट, फायबर बॉल्स अशा दिव्यांची नवीन तोरणे बाजारात असली तरी जुन्या रंगीबेरंगी तोरणांना अधिक मागणी आहे. मार्केटमध्ये विविध रंगाच्या मोत्यांच्या-खड्यांच्या लेस, दागिने, कपडे, पूजासाहित्य, देवादिकांच्या मूर्ती, भांडी आदी सर्वकाही मिळते.दिवाळीत तिखट गोड फराळ करण्याची आणि घराघरात वाटण्याची परंपरा आहे. खमंग चकल्या, चविष्ट चिवडा, गोड लाडू, खुसखुशीत शंकरपाळे, मिठाईचे पदार्थ घरी बनविले जातात. मात्र वेळेअभावी सध्या फराळही बाजारातून खरेदी करण्याचा ट्रेंड वाढत आहे. पारंपरिक पोह्याच्या चिवड्यापासून ते मका चिवडा, चकली, शंकरपाळी, करंजी, अनारसे, शेव, लाडू आदी पदार्थ इतवारीत मिळतात. काळानुरूप दिवाळी साजरी करण्यात काही बदल जाणवत आहे. पण नागपूरची दिवाळी वेगळीच असते, हे विशेष.

टॅग्स :DiwaliदिवाळीMarketबाजारnagpurनागपूर