शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच नजरेत प्रेम झालं अन् फक्त बोलण्यासाठी बसला साडेतीन लाखांचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 15:55 IST

'लव्ह ॲट फर्स्ट साईट'चा असाही गैरफायदा : 'इन्ट्रो' करून देण्याच्या नावाखाली 'आशिक'कडून उकळले पैसे

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रेम कधी, कुठे आणि कसं जडेल सांगता येत नाही... पण त्या प्रेमाचा गैरफायदा घेतला गेला तर आयुष्यभराची कमाईदेखील हातची जाऊ शकते, हे पुन्हा एकदा नागपुरात सिद्ध झाले आहे. चित्रपटात जसं पहिल्याच नजरेत प्रेम होतं... हिरो स्वप्न रंगवतो... नायिकेशी बोलण्यासाठी जिवाचा आटापिटा करतो. तसंच काहीसं नागपूरच्या एका २५ वर्षीय तरुणाच्या आयुष्यात घडलं. फरक इतकाच की, इथे शेवट हॅपी याच्या कडून एंडिंगचा नव्हता तर तब्बल साडेतीन लाख रुपयांच्या फसवणुकीचा ! तिच्या कार्यालयात काम करणाऱ्या तरुणाने तिच्याशी ओळखी करून देण्याच्या नावाखाली त्याच्याकडून ते पैसे उकळले. व्हॅलेंटाईन वीकमध्ये हा प्रकार समोर आला असून पाचपावली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित २५ वर्षीय तक्रारदार हा हाऊस किपिंगचे काम करतो. तो अगोदर शंकरनगरातील एका मोबाईल शोरूममध्ये काम करायचा. शोरूमजवळच एक इस्पितळ होते व तेथे काम करणारी तरुणी त्याला आवडायची. त्याने तिच्याच कार्यालयात काम करणाऱ्या सूरज गुलाब मडावी (गोपालनगर) याला मनातील गोष्ट सांगितले. जर मुलीशी ओळखी करून दिली तर दर महिन्याला हजार रुपये द्यावे लागतील असे सूरजने सांगितले. अगोदर तरुणाने नकार दिला. मात्र जर तिला पैसे दिले तरच ती तुझ्याशी बोलेल असे सूरजने म्हटल्यावर तरुणाने त्याला ते पैसे दिले.

मी तुमची मैत्री करून देतो असे सूरजने म्हटले व परत पैसे घेतले. मात्र तिने तुला मोबाइल क्रमांक देण्यास मनाई केली आहे असे त्याने तरुणाला सांगितले. तिला समजवावे लागेल, खर्च करावा लागेल असे म्हणत सूरजने तरुणाच्या प्रेमाचा गैरफायदा घेतला व मार्च २०२४ ते मे २०२५ या कालावधी तरुणाकडून साडेतीन लाख रुपये उकळले. मात्र त्याने एकदाही तिच्याशी तरुणाचे बोलणे करून दिले नाही. तरुणाला तो आणखी पैसे मागत होता. मात्र तरुणी बोलतच नसल्याने माझे पैसे परत कर असे तरुणाने म्हटल्यावर तुझ्या प्रेमाबाबत कार्यालयात सांगून तुझी बदनामी करेन अशी धमकी सूरजने दिली.

यानंतर स्वप्नांच्या दुनियेत रमलेला तरुण अखेर वास्तवात आला अखेर पोलिस ठाण्यात हिंमत करून तरुणाने पाचपावली पोलिसांनी सूरजविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रार केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Love at First Sight Scam: Man Loses ₹3.5 Lakhs

Web Summary : Nagpur man, 25, lost ₹3.5 lakhs to a colleague who promised to introduce him to a woman he liked. The colleague extorted money over months, never facilitating contact and threatening exposure when confronted. Police have registered a case.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर