तलावावर पोहायला जाणे पडले महागात; वडील व मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 14:23 IST2021-05-17T14:23:01+5:302021-05-17T14:23:19+5:30
Nagpur News मुलाचा वाढदिवस साजरा करायला तलावाकाठी गेलेल्या एका कुटुंबातील वडिल व मुलाला जलसमाधी मिळाल्याची घटना येथे घडली.

तलावावर पोहायला जाणे पडले महागात; वडील व मुलाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: मुलाचा वाढदिवस साजरा करायला तलावाकाठी गेलेल्या एका कुटुंबातील वडिल व मुलाला जलसमाधी मिळाल्याची घटना येथे घडली.
नागपूर शहरातील यशोधरा नगर मधील टिपू सुलतान चौक निवासी कुटुंब दुचाकीने सोमवारी दुपारी 'साडेअकरा वाजताच्या दरम्यान वाढदिवस साजरा करण्यासाठी हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी तलावावर दुचाकीने आले. पती पत्नी व दोन मुले सोबत होती.
त्यातील एका मुलाचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा केल्यानंतर बाप-लेक मोहगाव तलावातील पाण्यात उतरले. पाण्यातील गाळात फसल्याने ते पाण्यात बुडाले. हे चित्र पाहून पत्नीही तलावात उतरली. तलावावर उपस्थित असलेल्या काही जणांना हे दृश्य दिसले. यामुळे पत्नीला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. ? मात्र दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
मृत्यू पावलेल्या वडिलांचे वय ३२ असून मुलाचे वय १२ आहे. हिंगणा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. दोन्ही मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले असून हा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे.