ठरलं... ११ डिसेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते होणार समृद्धी महामार्गाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2022 07:40 PM2022-11-30T19:40:52+5:302022-11-30T19:41:42+5:30

Nagpur News बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी मार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर निघाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी नागपुरात उद्घाटन होणार आहे.

It was decided... Samriddhi Highway was inaugurated by the Prime Minister on 11th December | ठरलं... ११ डिसेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते होणार समृद्धी महामार्गाचे उद्घाटन

ठरलं... ११ डिसेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते होणार समृद्धी महामार्गाचे उद्घाटन

Next
ठळक मुद्देनागपूर मेट्रोच्या दोन मार्गांचेदेखील लोकार्पण

नागपूर : बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी मार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर निघाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी नागपुरात उद्घाटन होणार आहे. याचवेळी नागपूर मेट्रोच्या रिच-२ (कामठी मार्ग) व रिच-४ (सेंट्रल एव्हेन्यू) या मार्गांचेदेखील उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहतील.

समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाची मागील अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा होती. त्याचप्रमाणे मेट्रो मार्ग तयार असतानादेखील सुरू होत नसल्याने जनतेतूनच प्रश्न उपस्थित होत होते. जानेवारी महिन्यात पंतप्रधान इंडियन सायन्स कॉंग्रेसच्या उद्घाटनासाठी नागपुरात येणार आहेत. तेव्हाच हे उद्घाटन होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, ११ डिसेंबरच्या तारखेला पंतप्रधानांकडून होकार देण्यात आला आहे.

महामेट्रोच्या सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान नागपूरला येण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळ नागपूर आणि पुणे मेट्रो तेच नाशिक मेट्रो निओच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी देण्याची दाट शक्यता आहे. उद्घाटनाअगोदर नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्ग पूर्णत: तयार होईल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) उपाध्यक्ष सहव्यवस्थापकीय संचालक (व्हीसीएमडी) राधेश्याम मोपलवार यांनी स्पष्ट केले.

तीन आठवड्यांत दोनदा नागपूर दौरा

समृद्धी व मेट्रोच्या उद्घाटनाच्या तारखेने अधिकाऱ्यांनादेखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. इंडियन सायन्स काँग्रेसच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान ३ जानेवारीला नागपुरात येणार आहेत. त्यावेळी समृद्धी आणि नागपूर मेट्रो सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पंतप्रधानांनी तीन आठवड्यांच्या कालावधीत दोनदा शहरात येण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, पंतप्रधान नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या फुटाळा येथील म्युझिकल फाउंटनचे लोकार्पण करणार नाहीत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकांसाठी खुला करण्यापूर्वी ते आणखी विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

असा असेल दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ डिसेंबर रोजी सकाळी नागपूर विमानतळावर पोहोचतील आणि विमानतळ मेट्रो स्टेशनवर जातील. तेथे ते नागपूर मेट्रोच्या रीच-२ आणि रीच-४चे उद्घाटन करतील. त्यानंतर ते वायफळ गावाकडे रवाना होतील. तेथे ते समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करतील. त्यानंतर विमानतळावर येऊन दिल्लीकडे प्रयाण करतील.

प्रशासनाच्या बैठकांचे सत्र

पंतप्रधानांच्या दौऱ्यासंदर्भात प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून बैठकांचे सत्र सुरू आहेत. सुरक्षाव्यवस्था व इतर प्रशासकीय व्यवस्थांचा आढावा घेण्यात येत आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून नेमका कार्यक्रम लवकरच येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Web Title: It was decided... Samriddhi Highway was inaugurated by the Prime Minister on 11th December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.