शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

शॉर्टसर्किट नव्हे, मानवी चुकांमुळेच भंडाऱ्यात दहा तान्हुल्यांचे बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 06:34 IST

चौकशी समितीच्या अध्यक्षपदावरून आरोग्य संचालकांची उचलबांगडी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा/नागपूर : भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयातील शनिवारी पहाटेच्या आगीमागे शॉर्टसर्किटचे कारण दिले जात असले तरी प्रत्यक्षात मानवी चुकांमुळेच दहा तान्हुल्यांचा बळी गेल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. दोषीना वाचविण्याचे प्रयत्न चव्हाट्यावर आले असून त्याच कारणाने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घोषित केलेल्या सहा सदस्यीय चौकशी समितीच्या अध्यक्षपदावरून आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांना हटवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्याकडे ती जबाबदारी सोपविली.

दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी जिल्हा रूग्णालयाची पाहणी केली व दुर्घटनेत बळी पडलेल्या बाळांच्या मातापित्यांची भेट घेऊन सांत्वन केले. 

पोलीस कारवाईला चाैकशी समितीचा कोलदांडादोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलीस कारवाईतून वाचविण्यासाठीच चौकशी समितीचा खेळ रचण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. एरव्ही, असे काही ध़डले की प्रथमदर्शनी दोषी असलेल्यांविरूद्ध पोलिस गुन्हे दाखल करतात. इथे घाईघाईन चौकशी समिती नेमल्याने पोलीस कारवाईस लगाम बसला. 

त्या घटनेला केवळ हलगर्जीच कारणीभूत

भंडारा दुर्घटनेतील हलगर्जीची एक-एक बाब आता समोर येऊ लागली आहे. आग प्रतिबंधक उपाययोजनेच्या १ कोटी ५२ लाख ४४ हजार ७८३ रकमेच्या अंदाजपत्रकावर जिल्हा शल्यचिकित्सक व सार्वजनिक बांधकाम विभागाची स्वाक्षरीच नव्हती. यामुळे आरोग्य संचालकांकडून प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही. तो धूळखात पडून राहिला. 

डॉ. साधना तायडे याच त्यासाठी जबाबदार असताना त्यांनाच चौकशी समितीच्या अध्यक्षपदी नेमण्यात आले. या संदर्भातील एक पत्र ‘लोकमत’चा हाती लागले असून, त्यानुसार, भंडारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी आरोग्य विभागाचे संचालक डॉ. साधना तायडे व उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांना १५ सप्टेंबर २०२० ला आग प्रतिबंधक उपाययोजनेचा अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव पाठविला होता. परंतु त्या प्रस्तावावर जिल्हा शल्यचिकित्सक व सार्वजनिक बांधकाम विभागाची स्वाक्षरीच नव्हती. त्यासाठी ताे प्रस्ताव संचालकांनी रोखून धरला.

त्या परिचारिका कोण आहेत?या कक्षाची जबाबदारी सांभाळणाऱ्या परिचारिकांनी कक्षाला बाहेरून कडी लावल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर, त्या परिचारिका कोण हे शोधण्याचे काम कालपासून सर्वजण करताहेत. परंतु, आरोग्य यंत्रणा त्यांचे नाव समोर येऊ देत नाही. त्यामागे काही गंभीर कारण असावे, असे बाेलले जाते. 

खासगी रुग्णालय असते तर..?एखाद्या खासगी रुग्णालयात भंडारासारखी दुर्घटना घडली असती तर आत्तापर्यंत संबंधित डॉक्टर आणि रुग्णालयाच्या संचालकांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटकही झाली असती. मग अठ्ठेचाळीस तास उलटून गेली तरी अद्याप कोणावर करवाई नाही, साधा गुन्हाही दाखल झालेला नाही. कोण, कुणाला वाचवित आहे का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

आराेग्य संचालक डॉ. साधना तायडे यांची संशयास्पद नियुक्तीn अग्नितांडवाच्या चाैकशीसाठी आराेग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी नेमलेल्या चौकशी समितीच्या अध्यक्षपदावरुन आराेग्य संचालक डॉ. साधना तायडे यांची अवघ्या २४ तासातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उचलबांगडी केली. n फायर ऑडिट प्रकरणातील डॉ. तायडे यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येते. n नागपूरचे विभागीय आयुक्त डाॅ. संजीवकुमार आता समितीचे अध्यक्ष असतील. डॉ. तायडे आता समितीच्या केवळ सदस्य असतील.

लाेकमतची भूमिका

सहली नकोत, कारवाईच हवी! भंडाऱ्यात दहा बाळांचा करुण अंत झाल्यापासून राजकीय नेते सांत्वनाच्या नावाखाली जिल्हा रूग्णालयाला भेटी देत आहेत. मात्र, ४८ तास उलटून गेल्यानंतरही कुणावरही कारवाई झालेली नाही. जनतेला या राजकीय सहलींचा उबग आला आहे. यापुढे हे चालणार नाही. दाैरे, खोटे सांत्वन, कोरडी आश्वासने आणि सहनुभूती नको, कारवाई हवी, हीच जनतेत तीव्र भावना आहे. जनतेच्या भावना हीच आमची भूमिका! तेव्हा, ‘लोकमत’नेदेखील स्पष्ट भूमिका घेतली असून राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांची छायाचित्रे, कौतुक प्रकाशित न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :nagpurनागपूरBhandara Fireभंडारा आगDeathमृत्यूdoctorडॉक्टर