शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चीफ अकाऊन्टंटकडून आयटी कंपनीची फसवणूक, स्वत:च्या कामासाठी वापरली रक्कम

By योगेश पांडे | Updated: June 6, 2023 17:42 IST

महिला कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

नागपूर : आयटी पार्कमध्ये स्थित एका कंपनीची तेथे कार्यरत असलेल्या महिला चीफ अकाऊन्टंटने फसवणूक केली व ५.७८ लाखांचा गैरव्यवहार केला. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या कंपनीसाठी आरटीजीएसची परवानगी घेतली होती तेथे पैसे वळते न करता स्वत:चे टाईल्सचे बिल भरण्यासाठी रक्कम वापरली व उर्वरित रक्कम स्वत:च्या खात्यावर वळती करायला लावली. संबंधित महिलेवर अति विश्वास ठेवणे कंपनीला महागात पडले व अखेर या प्रकरणात राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत उगेमुगे यांची आयटी पार्क येथे विदर्भ इन्फोटेक प्रा.लि. ही कंपनी आहे. या कंपनीत चैताली पंजाबराव इंगलकर (४२, उदयनगर) ही महिला चीफ अकाउन्टंट म्हणून दीड वर्षांपासून कार्यरत होती. कंपनीचा पूर्ण आर्थिक लेखाजोखा सांभाळण्याची जबाबदारी तिच्याकडे होती व विविध क्लायंट्सला पेमेंट करण्याचे कामदेखील तीच करत होती.

कंपनीला एनजीआरटी सिस्टम्स या कंपनीला ५.७८ लाख रुपये देणे होते. चैतालीने १ नोव्हेंबर २०२२ रोजी ही रक्कम आरटीजीएस करण्यासाठी धनादेशावर कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांची स्वाक्षरी घेतली. मात्र तिने काही दिवस तो धनादेश स्वत:जवळच ठेवला व त्यानंतर नाशिक येथील मिहीर सिरॅमिक्स या कंपनीला ही रक्कम आरटीजीएसच्या माध्यमातून पाठविली. याची कंपनीत कुणालाच माहिती नव्हती. ऑडिटदरम्यान हा खुलासा झाला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित आस्थापनेशी संपर्क साधला असता धक्कादायक माहिती मिळाली.

चैतालीने २०२१ मध्ये त्या कंपनीकडून १.३३ लाखांच्या टाईल्स खरेदी केल्या होत्या. तिने त्यांना पैसे आरटीजीएस केले व मी कंपनीकडून कर्ज घेतले असल्याचे त्यांना सांगितले. उर्वरित रक्कम तिने तिच्या खात्यात वळती करण्याबाबत मिहीर सिरॅमिक्सच्या अधिकाऱ्यांना सांगितले. त्यांनी तोलाराम नावाच्या व्यक्तीच्या खात्यात ४५ हजार रुपये व चैतालीच्या खात्यात चार लाख रुपये पाठविले. विदर्भ इन्फोटेकच्या अधिकाऱ्यांनी चैतालीला याबाबत विचारणा केली असता तिने गैरव्यवहार केल्याचे कबूल केले. कंपनीचे व्यवस्थापक अश्विन जनबंधू (४१) यांच्या तक्रारीवरून राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात चैतालीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीnagpurनागपूर