शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

मेहंदीबाग आरयूबीसाठी पाईपलाईन हटविण्याचा कार्यादेश जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 00:01 IST

मेहंदीबाग येथील रोड अंडर ब्रिज (आरयूबी)करिता पाणी पाईप लाईन हटवावी लागत असून त्याकरिता कंत्राटदाराला कार्यादेश जारी करण्यात आला आहे. तसेच, परिसरातील अतिक्रमणही हटविण्यात आले आहे. महानगरपालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली.

ठळक मुद्देमनपाची हायकोर्टात माहिती : अतिक्रमणही हटविण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेहंदीबाग येथील रोड अंडर ब्रिज (आरयूबी)करिता पाणी पाईप लाईन हटवावी लागत असून त्याकरिता कंत्राटदाराला कार्यादेश जारी करण्यात आला आहे. तसेच, परिसरातील अतिक्रमणही हटविण्यात आले आहे. महानगरपालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली.न्यायालयाने ‘आरयूबी’चे बांधकाम पूर्ण करण्यासाठी २१ डिसेंबर २०१८ पर्यंत मुदत दिली होती. तसेच, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेला महापालिकेने आवश्यक सहकार्य करावे असे सांगितले होते. त्यानंतर रेल्वेने महापालिकेला ‘आरयूबी’च्या मार्गातील ड्रेनेज लाईन व पाणी पाईप लाईन हटविण्यास सांगितले. तसेच, महापालिकेला या कामासाठी १ कोटी ८६ लाख रुपये अदा केले. त्यानंतरही महापालिकेने हे काम केले नाही. तसेच, यासंदर्भात देण्यात आलेल्या स्मरणपत्रांचीही दखल घेतली नाही. परिणामी ‘आरयूबी’चे काम रखडले. दिलेल्या मुदतीत ‘आरयूबी’चे बांधकाम पूर्ण करता आले नाही. त्यामुळे रेल्वेने न्यायालयात अर्ज दाखल करून ‘आरयूबी’चे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आणखी मुदत वाढवून देण्याची विनंती केली आहे.या मुद्यावरून न्यायालयाने मनपाला नोटीस बजावली असता त्यांनी या कामासाठी डिमार्केशन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच, कार्यादेश जारी झाला असल्यामुळे डिमार्केशननंतर लगेच कामाला सुरुवात केली जाईल असे स्पष्ट केले. त्यावर रेल्वेने येत्या २७ फेब्रुवारीपर्यंत डिमार्केशन करून देण्याची ग्वाही दिली. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी ही बाब लक्षात घेता प्रकरणावर १८ एप्रिल रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अनिल किलोर, रेल्वेतर्फे अ‍ॅड. नितीन लांबट तर, मनपातर्फे अ‍ॅड. संगीता जाचक यांनी कामकाज पाहिले.कृती समितीची होती याचिकायासंदर्भात खैरीपुरा-बिनाकी-मंगळवारी-प्रेमनगर निवासी कृती समितीने जनहित याचिका दाखल केली होती. मेहंदीबाग रेल्वे फाटकावर यापूर्वी रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) बांधण्यात आला आहे. परंतु, परिसरातील नागरिकांना या पुलावरून गेल्यास ‘यू टर्न’ घेऊन घराकडे जाणे अडचणीचे आहे. परिणामी, परिसरातील नागरिक रेल्वे फाटकातूनच जात होते. रेल्वे फाटकाजवळ दोन्ही बाजूने केवळ १३ फुटाचा मार्ग होता. त्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे न्यायालयाने ‘आरयूबी’ बांधण्याचा आदेश दिला होता.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका