रेल्वेच्या धडकेत इसमाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:08 IST2021-03-19T04:08:48+5:302021-03-19T04:08:48+5:30

नागपूर : रेल्वेची धडक बसल्यामुळे श्याम वामन खापेकर (वय ४१, रा. पंचशील नगर, पाचपावली) यांचा करुण अंत झाला. गुरुवारी ...

Isma dies in train collision | रेल्वेच्या धडकेत इसमाचा मृत्यू

रेल्वेच्या धडकेत इसमाचा मृत्यू

नागपूर : रेल्वेची धडक बसल्यामुळे श्याम वामन खापेकर (वय ४१, रा. पंचशील नगर, पाचपावली) यांचा करुण अंत झाला. गुरुवारी सकाळी ८ च्या सुमारास ही घटना घडली. गुणवंत वामन खापेकर (वय ३८) यांनी दिलेल्या माहितीवरून पाचपावली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

---

प्रमाणाबाहेर औषध घेतल्याने मृत्यू

नागपूर : मोठ्या प्रमाणात औषध सेवन केल्यामुळे ज्योती रामकृष्ण राऊत (वय ४०) यांचा मृत्यू झाला. जुना बाबुळखेडा परिसरात राहणाऱ्या ज्योती राऊत यांनी प्रकृती खराब असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या गोळ्या, औषध घेतले. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली. १० मार्चला त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे बुधवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीवरून अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

---

Web Title: Isma dies in train collision