शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी कारवायांचा कट रचणारे 2 आयएसआय एजंट नागपुरातून अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 08:12 IST

नागपूरसह राज्यातील इतर भागामध्ये मोठ्या प्रमाणावर घातपात घडवण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांचा प्रयत्न मिलिट्री इंटेलिजन्स (एमआय), अ‍ॅण्टी टेररिस्ट सेल (एटीसी) मुंबई आणि नागपूर पोलिसांच्या चमूने शुक्रवारी हाणून पाडला.

- आशिष दुबेनागपूर - नागपूरसह राज्यातील इतर भागामध्ये मोठ्या प्रमाणावर घातपात घडवण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांचा प्रयत्न मिलिट्री इंटेलिजन्स (एमआय), अ‍ॅण्टी टेररिस्ट सेल (एटीसी) मुंबई आणि नागपूर पोलिसांच्या चमूने शुक्रवारी हाणून पाडला. पाकिस्तानी गुप्तचर एजन्सी आयएसआयचा एक एजंट आणि एका पाकिस्तानी नागरिकास नागपुरातून अटक केली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. आणखी एक दुसरा एजंट आणि तीन अन्य पाकिस्तानी नागरिकांची अटक व्हायची होती.

लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरसह देशातील काही भागांमध्ये पाकिस्तानी गुप्तचर एजन्सी आयएसआय एजंट सक्रिय झाल्याची माहिती मिलिट्री इंटेलिजन्सला मिळाली होती. त्यानुसार एजंटांवर पाळत ठेवली जात होती. मिलिट्री इंटेलिजन्स आणि एटीसी मिळून हे काम करीत होते. या दरम्यान मिळालेल्या गंभीर माहितीनुसार देशातील चार ठिकाणी धाड टाकण्याची योजना बनवण्यात आली. नागपूर शिवाय पंजाब, उत्तर प्रदेशातील नोएडा आणि रायबरेली येथे एजंट लपून बसले होते.

सूत्रांचे म्हणणे आहे की, शुक्रवारी दुपारी गणेशपेठ बस स्टॅँडजवळील एका इमारतीवर धाड टाकली असता त्यांना एक पाकिस्तानी एजंट घटनास्थळीच सापडला. पकडण्यात आलेला एजंट मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. याशिवाय नांदेड येथे राहणारा एक एजंट आणि तीन इतर पाकिस्तानी नागरिकांचाही चमू शोध घेत आहे.

टॅग्स :ArrestअटकISIआयएसआयCrime Newsगुन्हेगारीTerrorismदहशतवाद