लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर म्हाडाच्या बंगल्यासाठी पात्र आहेत की नाही, यावर २५ मार्चपर्यंत निर्णय घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.
आंबेडकर यांना अमरावती हाउसिंग अॅण्ड एरिया डेव्हलपमेंट बोर्डाच्या उमरी उमरखेड येथील योजनेमधील एक बंगला उच्च उत्पन्न गटातून वाटप झाला आहे. त्या निर्णयाला विनायक कटरे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आंबेडकर यांच्या नावावर नगरपालिका क्षेत्रात मोकळा भूखंड आहे. त्यामुळे ते म्हाडा नियम ९(१ए) अनुसार संबंधित बंगला मिळण्यासाठी अपात्र आहेत, असा दावा याचिकेत करण्यात आला होता. आंबेडकर यांनीही त्यांच्या नावावर मोकळा भूखंड असल्याची बाब मान्य केली. त्यामुळे न्यायालयाने हा आदेश दिला.
तसेच, पडताळणीमध्ये आंबेडकर अपात्र आढळून आल्यास याचिकाकर्ते कटरे यांची बंगला देण्याची मागणी गुणवत्तेच्या आधारावर विचारात घ्या व पात्रता सिद्ध झाल्यास त्यांना बंगला वाटप करा, असे निर्देशदेखील दिले आणि आंबेडकर व कटरे हे दोघेही अपात्र ठरल्यास कायद्यानुसार पुढील कार्यवाही करण्यास सांगितले. बंगले वाटपाच्या प्रतीक्षा यादीमध्ये कटरे यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. आंबेडकर अपात्र ठरल्यास संबंधित बंगल्यावर कटरे यांचा दावा लागू होणार आहे. या प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व राज वाकोडे यांच्यापुढे सुनावणी झाली. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. ध्रुव गुप्ता तर, आंबेडकर यांच्यातर्फे अॅड. संदीप चोपडे यांनी कामकाज पाहिले.
Web Summary : The Nagpur High Court ordered a decision by March 25th regarding Prakash Ambedkar's eligibility for a MHADA bungalow. A petition challenged his allotment due to land ownership. The court instructed considering the petitioner if Ambedkar is ineligible.
Web Summary : नागपुर उच्च न्यायालय ने प्रकाश आंबेडकर की म्हाडा बंगले की पात्रता पर 25 मार्च तक निर्णय का आदेश दिया। जमीन के स्वामित्व के कारण उनकी आवंटन को चुनौती दी गई थी। अदालत ने आंबेडकर के अयोग्य होने पर याचिकाकर्ता पर विचार करने का निर्देश दिया।