सिंचन घोटाळ्याची १६ पासून हायकोर्टात सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 22:28 IST2019-12-10T22:26:46+5:302019-12-10T22:28:22+5:30
राज्यात बहुचर्चित सिंचन घोटाळ्याच्या घटनाक्रमानंतर आता या प्रकरणाची सुनावणी १६ डिसेंबरपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात होणार आहे.

सिंचन घोटाळ्याची १६ पासून हायकोर्टात सुनावणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात बहुचर्चित सिंचन घोटाळ्याच्या घटनाक्रमानंतर आता या प्रकरणाची सुनावणी १६ डिसेंबरपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात होणार आहे.
याचिकाकर्ता जनमंचचे वकील फिरदोस मिर्झा आणि अतुल जगताप यांचे वकील श्रीधर पुरोहित यांनी मंगळवारी न्यायालयाला याप्रकरणी सुनावणी करण्याची विनंती केली होती. त्यांची विनंती मान्य करीत न्यायमूर्ती झेड.ए. हक आणि न्यायमूर्ती मुरलीधर गिरडकर यांनी १६ डिसेंबरपासून सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी तत्कालीन भाजपा सरकारने केली होती. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या नागपूर आणि अमरावती एसीबीने मुख्य आरोपी अजित पवार यांना क्लीन चिट दिली आहे. तर दुसरीकडे याचिकाकर्त्यांनी एसीबी आणि एसआयटीच्या कार्यशैलीवर अविश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे १६ पासून होणाऱ्या सुनावणीवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.